AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi CM Oath Ceremony : दिल्लीकरांच्या भवितव्याची ‘रेखा’ नव्या मुख्यमंत्र्यांच्या हाती, जातीय समीकरण साधले; कुणी कुणी घेतली शपथ?

प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, अभय वर्मा, आशिष सूद, रवींद्र राज आणि पवन शर्मा यांसारखे अनेक दिग्गज मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत होते. पण भाजपने दिल्लीची कमान महिला नेतृत्वाकडे सोपवण्याचा निर्णय घेत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Delhi CM Oath Ceremony : दिल्लीकरांच्या भवितव्याची 'रेखा' नव्या मुख्यमंत्र्यांच्या हाती, जातीय समीकरण साधले; कुणी कुणी घेतली शपथ?
delhi cm oath
| Updated on: Feb 20, 2025 | 1:12 PM
Share

भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपख घेतली. नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रेखा गुप्ता यांची काल भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. रेखा गुप्ता यांनी नव्व्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या.

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, अभय वर्मा, आशिष सूद, रवींद्र राज आणि पवन शर्मा यांसारखे अनेक दिग्गज मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत होते. पण भाजपने दिल्लीची कमान महिला नेतृत्वाकडे सोपवण्याचा निर्णय घेत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

यानंतर आज दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12.35 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांसह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. यावेळी रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान मोदींना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा मंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

प्रवेश वर्मा

प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत. प्रवेश त्यांनी आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण घेतले. यानंतर, त्यांनी किरोरीमल कॉलेजमधून कला शाखेत पदवी देखील मिळवली. प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

मनजिंदर सिंग सिरसा

भाजपने राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा यांना उमेदवारी दिली होती. मनजिंदर सिंग यांनी १८,१९० मते मिळवत ही जागा जिंकली. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिरोमणी अकाली दल पक्षात होते. मात्र डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी अकाली दलाला रामराम करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांची थेट दिल्लीच्या मंत्रि‍पदी वर्णी लागली आहे.

कपिल मिश्रा

कपिल मित्रा हे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पार्टी सोडून भाजपत सहभागी झाले. त्यांनी करावल नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. कपिल मिश्रा यांना हिंदू नेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आंबेडकर कॉलेजमधून समाजकार्यात बीए आणि नंतर एमए केले आहे.

आशिष सूद

जनकपुरीमधून निवडून आलेल्या आशिष सूद यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीतील पंजाबी समाजाचे ते एक मोठा चेहरा आहे, असे मानले जातो. आशिष सूद हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आशिष यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात.

रवींद्र इंद्रराज सिंह

भाजपने दलित नेते रवींद्र इंद्रराज सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रवींद्र इंद्रराज सिंह यांनी बवाना विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. त्यांनी आम आदमी पक्षाचे जय भगवान उपकर यांचा ३१,४७५ मतांनी पराभव केला. ते पहिल्यांदाच बवाना राखीव जागेवरून आमदार झाले आहेत.

पंकज सिंह

पंकज सिंह यांनी पहिल्यांदाच विकासपुरी मतदारसंघातून भाजपला पहिला विजय मिळवून दिला. पंकज कुमार सिंह यांनी आपचे महेंद्र यादव यांचा १२८७६ मतांनी पराभव केला. पंकज सिंह हे पूर्वांचलचे ठाकूर आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपने पूर्वांचल समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान भाजपने मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही, अशी चर्चा होत आहे.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.