Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Result 2025 : दिल्ली कुणाची? मतमोजणीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्कर, निकालाचं काऊंटडाऊन सुरु, निकाल वाचा एका क्लिकवर

Delhi Election Result 2025 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीच्या रणसंग्रामात भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. सुरुवातीचे कौल समोर येत आहे. मतमोजणी सुरू आहे. या विधानसभेत काँग्रेस खाते उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Delhi Election Result 2025 : दिल्ली कुणाची? मतमोजणीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्कर, निकालाचं काऊंटडाऊन सुरु, निकाल वाचा एका क्लिकवर
दिल्लीचा पहेलवान कोण?
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 8:45 AM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचं डबलसीट सरकार दाखल झाले. त्यानंतर आज दिल्लीचा आखाडा कोण गाजवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. देशाच्या राजधानीत भाजपचे कमबॅक होणार, असा दावा एक्झिट पोलने केला आहे. तर आप सुद्धा मोठी मुसंडी मारण्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसला निदान एक तरी जागा निवडून आणता येईल की नाही, हे आज स्पष्ट होईल. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील INDIA आघाडीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. सध्या पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आप आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपलेला नाही.

कल सांगतो काय?

सध्या पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात होईल. तर सुरुवातीच्या कौलमधील 42 जागांचे कल समोर आले आहेत. त्यात 15 जागांवर आप तर 26 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर दिसत आहे. कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसचा दुष्काळ संपलेला नाही. त्यातच आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

27 वर्षांपासूनचा सत्तेचा वनवास संपणार?

सुरुवातीच्या कलामध्ये भाजपा बहुमतामध्ये भाजप केवळ 5 जागा दूर आहेत. दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. भाजप 27 वर्षानंतर पुन्हा जोरदार कमबॅक करताना दिसत आहे. दिल्लीत भाजपचे कमळ फुलल्यास हा मैलाचा दगड ठरणार आहे. भाजपचा झंझावत थांबवण्यासाठी इंडिया आघाडी अपयशी ठरत असल्याचे यावरून दिसून येते. अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया हे तिघे पण सध्या पिछाडीवर दिसत आहेत.

एक्झिट पोलचे मत कुणाच्या पारड्यात?

डीव्ही रिसर्च करून जारी करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपच्या पारड्यात मतं टाकले आहे. दिल्लीमध्ये भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आपला 25 ते 29 जागेचा कौल देण्यात आला आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपताना दिसत नाही. या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्व एक्झिट पोलने दिल्लीमध्ये भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. आपला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेस विधानसभेत असेल की नाही, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. भाजप तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते. तुम्ही टीव्ही 9 वृत्त वाहिनीवर निकालाबाबत याविषयीची अपडेट पाहू शकतात. टीव्ही 9 चं वेब पोर्टल तसेच युट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला निकालाची प्रत्येक अपडेट जाणून घेऊ शकता.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.