AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JNU विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा हाणामारी, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी

वसंतगंज पोलिस ठाण्यात त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. जेएनयूमध्ये कॅम्पसमध्ये डावे आणि एबीव्हीपी सदस्यांमधील हाणामारीचीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलीस म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना एम्स (AIIMS) आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

JNU विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा हाणामारी, ABVP ने AISA, SFI नेत्यांवर हल्ला केल्याचा आरोप, अनेक जखमी
JNU campus violence File photo
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 12, 2022 | 12:13 PM
Share

दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कॅम्पसमध्ये 14 नोव्हेंबरला रात्री ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) संघटनांच्या सदस्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. वसंतगंज पोलिस ठाण्यात त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. जेएनयूमध्ये कॅम्पसमध्ये डावे आणि एबीव्हीपी सदस्यांमधील हाणामारीचीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचे पोलीस म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना एम्स (AIIMS) आणि सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की ABVP आणि डाव्या सदस्यांनी नोंदवलेल्या तक्रारींची चौकशी चालू आहे आणि तथ्ये तपासल्यानंतर कारवाई सुरू केली जाईल.  ABVP ने आरोप केला आहे की त्यांचे काही सदस्य विद्यार्थी कक्षात बैठक घेत होते तेव्हा काही डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी बैठकीत अडथळा आणला आणि नंतर हाणामारी झाली. ABVP ने म्हटले आहे की AISA आणि SFI च्या विद्यार्थ्यांनी ABVP च्या महिलांसह सदस्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या सदस्यांना गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे.

मात्र, जेएनयू स्टुडंट्स युनियनची अध्यक्षा आणि SFI च्या सदस्या ऐशी घोष यांनी दावा केला की ABVP चे “गुंडांनी” डाव्या विद्यार्थ्यांवर पहिला हल्ला केला. या हल्ल्यावर जेएनयू प्रशासन गप्प बसणार का, असा सवाल तिने केला. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर जखमी विद्यार्थ्यांचे फोटोही पोस्ट केले आहेत.

हे ही वाचा-

पाकिस्तानच्या तुरुंगातून 20 भारतीय मच्छिमारांची सुटका, उद्या वाघा बॉर्डरवर भारताकडे सोपवणार

आधी बलात्कार, कृत्य उघडकीस येईल म्हणून हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये लपवला, वाचा अल्पवयीन मुलासोबत काय घडले?

UP Elections 2022: जिन्नांना पाठिंबा देणारेच तालिबान समर्थक आहेत- योगींची विरोधकांवर टीका

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?