AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीला 97 टक्के तरी देशात मेडिकलची सीट नाही, नवीन शेखरप्पाच्या वडीलांनी सरकारला आरसा दाखवला

बारावीला 97 टक्के मिळूनही माझ्या मुलाला राज्यात मेडीकलची सीट मिळू शकली नाही. इथं मेडीकलची सीट मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात पण त्यापेक्षा कमी पैशात विदेशात तेच शिक्षण मिळतंय.

बारावीला 97 टक्के तरी देशात मेडिकलची सीट नाही, नवीन शेखरप्पाच्या वडीलांनी सरकारला आरसा दाखवला
Naveen Ukraine stdudent deathImage Credit source: TV9
| Updated on: Mar 02, 2022 | 8:17 AM
Share

गेल्या आठवड्याभरापासून यूक्रेनचं मेडिकल शिक्षण चर्चेत आलंय. तिथं शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं यापासून ते कमी मार्क असलेलेच तिथं जातात का याचीही चर्चा होतेय. त्यातच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांच्या वक्तव्यानं चांगलाच वाद झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर विविधांगी चर्चा होतेय. आता त्यातच (Ukraine) यूक्रेनमध्ये (Russia) रशियन गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नवीन शेखरप्पाच्या वडीलांनी वास्तव सांगितलंय. ते मात्र सरकारच नाही तर सर्वांचेच डोळे उघडणारं आहे.

काय म्हणालेत नवीन शेखरप्पाचे वडील? नवीन शेखरप्पा हा मुळचा कर्नाटकचा पण त्याचा यूक्रेनमध्ये गोळीबारात मृत्यू झालाय. तो राशन आणण्यासाठी बाहेर पडलेला असताना रशियन सैन्याच्या गोळीबारात त्याला जीव गमवावा लागला. तो नेमका कशासाठी यूक्रेनला गेला होता, त्याला किती मार्कस इथं होते याचा शोध सुरु झाला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता नवीन शेखरप्पाच्या वडीलांनी वास्तव सांगितलं. ते म्हणाले, – बारावीला 97 टक्के मिळूनही माझ्या मुलाला राज्यात मेडीकलची सीट मिळू शकली नाही. इथं मेडीकलची सीट मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात पण त्यापेक्षा कमी पैशात विदेशात तेच शिक्षण मिळतंय.

काय म्हणाले होते केंद्रीय मंत्री जोशी? प्रल्हाद जोशी हे कर्नाटकच्याच धारवाडचे खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्रीही. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते की, 90 टक्के विद्यार्थी जे यूक्रेन किंवा विदेशात मेडिकलच्या शिक्षणासाठी जातात, ते आपल्या देशातल्या परिक्षेत क्वालिफायही होऊ शकत नाहीत. प्रल्हाद जोशींच्या ह्या वक्तव्यावर आणि विशेषत: त्याच्या टायमिंग देशभर टिका केली जातेय. कारण यूक्रेनमध्ये जवळपास 20 हजार भारतीय अडकले, ज्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांना वेळीच परत आणण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याची टीका होतेय. त्या पार्श्वभूमीवर जोशींचं वक्तव्यानं संताप निर्माण झाला. पण नवीन शेखरप्पाच्या वडीलांच्या वक्तव्यानं सरकारला विचार करायलाही भाग पाडलं आहे. कारण नवीनला 97 टक्के होते आणि तरीही त्याला मेडिकलची सीट मिळाली नव्हती. परिणामी त्याला मायदेश सोडून यूक्रेनला जावं लागलं आणि तिथल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा: Russia-Ukraine Conflict: पुतीनचा एक घाव आणि यूक्रेनचे तीन तुकडे, अमेरीका, नाटोला दातखिळी

युक्रेनमध्ये डॉक्टर होण्यासाठी का जातात विद्यार्थी? काय आहे तिथल्या MBBS चं वैशिष्ट्य? वाचा सविस्तर…

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....