घराजवळचं कोरोना लसीकरण केंद्र कसं शोधाल?, ‘असं’ करा लोकेशन सर्च

अनेकांना कोरोना लस घेण्यासाठी जवळचे लसीकरण केंद्र कोणते आहे; याची माहिती मिळण्यास अनेकांना मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे जाणून घेऊयात आपल्या जवळचे लसीकरण केंद्र नेमके कसे शोधावे. (corona vaccination center covin portal)

घराजवळचं कोरोना लसीकरण केंद्र कसं शोधाल?, 'असं' करा लोकेशन सर्च
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 7:06 PM

मुंबई : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा एक नामी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून त्यासाठी नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेकांना कोरोना लस घेण्यासाठी जवळचे लसीकरण केंद्र कोणते आहे, याची माहिती मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात आपल्या जवळचे लसीकरण केंद्र नेमके कसे शोधावे. (detail information of how to find the near Corona Vaccination center on Covin portal)

लसीकरण केंद कोठे शोधाल

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्र शोधायचे असेल तर केंद्र सरकारने त्यासाठी दोन उपाय उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना लसीकरणाचे सर्व अपडेट https://www.cowin.gov.in/home येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी लसीकरणाच्या संबंधित नंबर, लसीकरणाचे ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

https://www.cowin.gov.in/home या पोर्टलवर जाऊन कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करता येते. त्यासाठी नागरिकांना आपला मोबाईल नंबर, त्यानंतर आधार कार्ड किंवा कोणतेही ओळपत्र लागेल. या ओळखपत्राचा नंबर टाकून नागरिकांना लसीकरणासाठी त्यांचे रजिस्ट्रेशन करता येईल.

त्यानंतर https://www.cowin.gov.in/home या पोर्टलवर एक मॅप दिसेल. तसेच बाजूला सर्च ऑप्शनसुद्धा दिसेल. या सर्च ऑप्शनमध्ये गाव, शहर, जिल्हा तसेच राज्याचे नाव टाकून कोरोना लसीकरण केंद्र शोधता येऊ शकते.

आरोग्य सेतू अ‌ॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्र शोधता येईल

https://www.cowin.gov.in/home याशिवाय आरोग्य सेतू अ‌ॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्र शोधता येईल. आरोग्य सेतू अ‌ॅपच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नावनोंदणी केली जाऊ शकते. तसेच या अ‌ॅपवरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्रांची माहिती दिलेली आहे. प्रत्येक जिल्हा, राज्य, नगर पंचायत यांच्या वेबसाईट्स तसेच सोशल मीडिया अकाऊंट यावरसुद्धा कोरोना लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE :  चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे 492 नवे रुग्ण, एकूण 442 जणांचा मृत्यू

Corona Update : 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?

(detail information of how to find the near Corona Vaccination center on Covin portal)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.