VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?

कोरोना लस घेतलेल्या अनेकांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसत आहे. त्यावरच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

VIDEO: 'कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली', तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?

नवी दिल्ली : देशभरात एकीकडे कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे (Covid Vaccine), तर दुसरीकडे देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) येऊन धडकलीय. या कोरोना प्रकोपात नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पुन्हा मागील वर्षी सारखी तर होणार नाही ना अशी चिंता अनेकांना लागून आहे. त्यामुळेच कोरोना लसीकरणाकडे सर्वात मोठा उपाय म्हणून पाहिलं जात आहे. कोरोना लस घेतलेल्या अनेकांचा आत्मविश्वासही वाढलेला दिसत आहे. त्यावरच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय. तो सध्या व्हायरल होतोय. त्याचाच हा फॅक्टचेक (Fact Check of Viral video showing Man kicking running train after getting second corona vaccine dose).

या व्हिडीओत एक व्यक्ती रेल्वे रुळावरुन हॉर्न देत वेगाने धावत येणाऱ्या रेल्वेसमोर येऊन डान्स करताना दिसत आहे. तसेच रेल्वे जवळ आल्यानंतर तो त्या रेल्वेला थेट लाथ मारतो आणि रेल्वे उलट्या दिशेने मागे जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर या व्यक्तीने असं केल्याचं उपरोधात्मक कॅप्शनही दिलेलं आहे. मात्र, हा व्हिडीओ खरा नसून एडिटींग केलेला आहे. केवळ कोरोना लस घेतलेल्या लोकांचा अतिआत्मविश्वास आणि त्यांच्याकडून होणारा निष्काळजीपणा यावर भाष्य करत हा व्हिडीओ बनवण्यात आलाय.

कोरोना लसीकरणावरुन टोलेबाजी करणारा हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सच्या चांगलाच पसंतीला उतरलाय. तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिलंय की कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतरही लोकांना पुन्हा कोरोना संसर्ग का होतोय?

बातमी लिहिली जाऊपर्यंत हा व्हिडीओ 43 हजार पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला होता. तसेच 1,700 हून अधिक लाईक्सचा पाऊस पडला होता. एका यूजरने म्हटलं, ‘हा व्हिडीओ रजनीकांतच्या चित्रपटाचा सीन वाटतोय’, तर दुसऱ्याने लिहिलं ‘लसीची चाचणी अजून सुरु आहे.’

हेही वाचा :

VIDEO | ट्राफिक जॅममुळे बाचाबाची, नगराध्यक्षांनी कानाखाली पेटवल्याने भररस्त्यात हाणामारी

‘मोठ्या राजकीय नेत्याची Live झूम मिटींग’, अचानक पत्नी नग्न अवस्थेत दिसल्याने गदारोळ

VIDEO: माणसांना लाज वाटावी असं कावळ्याचं शहाणपण, व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल

व्हिडीओ पाहा :

Fact Check of Viral video showing Man kicking running train after getting second corona vaccine dose

Published On - 1:13 am, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI