AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारचा विजय हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मोठी पावती – भुवनेश्वर विमानतळावर धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागतादरम्यान वक्तव्य

बिहारमधील वियधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे भुवनेश्वर विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. जनतेने काँग्रेसच्या फुटीर राजकारणाला कायमचे नाकारले आहे हेच बिहारच्या या ऐतिहासिक विजयाने सिद्ध झालं, असं ते म्हणाले.

बिहारचा विजय हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मोठी पावती - भुवनेश्वर विमानतळावर धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागतादरम्यान वक्तव्य
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
| Updated on: Nov 22, 2025 | 9:56 AM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला ऐतिहासिक विजय मिळाला. या घवघवीत यशानंतर ओडिशाच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आज भुवनेश्वर विमानतळावर जोरदार आणि भव्य स्वागत करण्यात आले. ओडिशाच्या विविध भागातून हजारो लोक, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. यावेळी माध्यमांशी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी बिहारमध्ये एनडीएच्या अभूतपूर्व विजयाबद्दल बिहारमधील जनतेचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे संघटनात्मक कौशल्य आणि बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर, जनतेने विश्वास दाखवला असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

फुटीरतावादी राजकारण जनतेने नाकारलं

पंतप्रधान मोदी पूर्व भारताच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वोदयाची कल्पना करत आहेत, कारण पूर्व भारताच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. बिहारची सेवा करण्याची एनडीएला पुन्हा मिळालेली संधी ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाची एक महत्त्वाची पावती आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कल्याणकारी व्यवस्थेमुळे पंतप्रधान जनतेचे विश्वासू नेते बनले आहेत. काँग्रेसच्या फुटीच्या आणि नकारात्मक राजकारणाला जतनेने पूर्णपणे नाकारलं आहे, असंही ते म्हणाले.

यासोबतच, धर्मेंद्र प्रधान यांनी नुआपाडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार जय ढोलकिया यांच्या मोठ्या विजयाबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि प्रदेश भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांचे अभिनंदन केले.

स्वागत सोहळ्यादरम्यान, ओडिशाचे पारंपारिक नृत्य आणि संगीतामुळे संपूर्ण विमानतळात उत्साही वातावरण होतं. पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या कलाकारांनी घंटा, शंख आणि ढोल ताशांच्या तालावर केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले. फुलांचे हार, जयजयकार आणि फटाक्यांच्या आवाजाने विमानतळ परिसर भरून गेला होता. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे थेट पुरी श्रीमंदिरात गेले, त्यांनी महाप्रभूंचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ