AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ध्रुव राठीसोबत भयंकर घडलं, 20-30 जण घरात घुसले, मोबाईल हिसकावला अन्…; मागील 24 तासांत काय झालं?

ध्रुव राठीने पोलीस आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बळजबरीने ताब्यात घेऊन 22-23 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ध्रुव राठीसोबत भयंकर घडलं, 20-30 जण घरात घुसले, मोबाईल हिसकावला अन्...; मागील 24 तासांत काय झालं?
dhruv rathee newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 1:23 PM
Share

युट्यूबर ध्रुव राठी याला काल दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला रात्री तीन वाजता सोडण्यात आलं. पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर ध्रुव राठीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ध्रुवने व्हिडिओतून पोलीस आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी मला ताब्यात घेतलं नव्हतं, तर माझं किडनॅप केलं होतं, असा आरोप त्याने केला. यावेळी ध्रुवने भारतीय नागरिकत्वावरून होणाऱ्या आरोपांनाही उत्तर दिलं.

ध्रुव राठीने भारतीय पासपोर्ट दाखवत भारतीय नागरिक असल्याचे सांगितले. यापुढेही भारतीय नागरिकच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ध्रुव राठी हा जर्मन नागरिक असल्याचा आरोप करणयात येत होता. त्यानंतर राठीने आरोपांना उत्तर दिलं आहे. ध्रुव राठीने सांगितले की, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता घरात झोपलो होतो. आईने दरवाजा उघडल्यानंतर अनेक जण घराच्या बाहेर होते. जवळपास 20 जण असेल. सर्व जण अचानक माझ्या बेडरुममध्ये घुसले. मला काही कळण्याच्या आतच ओढून बाहेर नेलं, असे राठीने सांगितलं.

ध्रुव राठीने सांगितलं की, मला दुखापत झाली. मला पायात चप्पल घालण्याचाही वेळ दिला नाही. त्यानंतर बळजबरीने जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेलं. पोलिसांनी माझा आणि आई-वडिलांचा फोन ताब्यात घेतला. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर वकिलांना भेटण्याची विनंती केली. परंतु त्यांनी परवानगी दिली नाही. मला जवळपास 22-23 तास पोलीस स्टेशनला बसवण्यात आलं, असा आरोप करत राठीने मोदी  सरकारवर टीका केली.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव राठी याला ग्रुरूग्रामच्या सेक्टर-56 येथील केंद्रीय विहारातून ताब्यात घेण्यात आलं. या भागात राहत असलेल्या आई-वडिलांना ध्रुव राठी भेटायला आला होता. ध्रुव राठीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने त्याच्या घरी पोहोचले. त्यानंतर सकाळी सात वाजताच राठीला घरातून उचललं. ध्रुव राठीला सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सोडताना इशारा दिला की,  जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलनाचा प्रयत्न केला, तर कारवाई केली जाईल’. परंतु देशासाठी आवाज उचलत राहू, असे त्याने म्हटलं. व्हिडिओच्या शेवटी त्याने ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम’ म्हटलं.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट