AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा…

शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर (Interest Rate) ठेवण्याची घोषणा केली. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक पत्रक जारी करेल. यावरून हे स्पष्ट झालंय, की येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावं लागणाराय.

Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा...
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 12:27 PM
Share

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Rbi Governor Shaktikanta Das) यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीचे (MPC) चौथे द्विमासिक चलनविषयक धोरण सादर केले. यावेळी शक्तिकांत दास यांनी व्याजदर स्थिर (Interest Rate) ठेवण्याची घोषणा केली. रेपो दर (repo rate) 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर (reverse repo rate) 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय. एमपीसीनं आपली अनुकूल भूमिका कायम ठेवलीय. गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआय(RBI)नं रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता.

डिजिटल पेमेंट महाग असू शकते RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटविषयी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक पत्रक जारी करेल. यावरून हे स्पष्ट झालंय, की येत्या काळात आपल्या सर्वांना डिजिटल पेमेंटच्या बदल्यात अतिरिक्त शुल्क भरावं लागणाराय. RBIदेखील UPI आधारित फीचर फोन उत्पादनं लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे गव्हर्नर म्हणाले.

डिजिटल पेमेंटमध्ये देशात झपाट्यानं वाढ 2016मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंट (Digital Payments) झपाट्यानं वाढलं. कोरोना (Corona) विषाणूच्या महामारीच्या काळात देशातील डिजिटल पेमेंटचा आलेख उच्च पातळीवर पोहोचला. संसर्ग टाळण्यासाठी लोक डिजिटल पेमेंटवर अवलंबून होते. त्यामुळे देशात होत असलेल्या डिजिटल पेमेंटचा वेग सातत्यानं वाढतोय.

काय सांगतो अहवाल? एका अहवालानुसार, गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm), फोन-पे (Phone-Pe) आणि भीम अॅप (BHIM App) यासारख्या इतर यूपीआय (UPI) प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला सुमारे 1.22 अब्ज म्हणजेच सुमारे 122 कोटी रुपयांचे व्यवहार होऊ लागले आहेत. दुसरीकडे, जर आपण 2016मधली म्हणजेच 5 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची तुलना केली तर आता त्यात 550% वाढ झालीय. 2016-17मध्ये 1, 004 कोटी डिजिटल व्यवहार झाले. 2020-2021मध्ये हा आकडा 5, 554 कोटींवर पोहोचला. 2020च्या तुलनेत एप्रिल-मे 2021मध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 100%पेक्षा जास्त वाढ झालीय.

काय आहे UPI? UPI, ज्याला आपण इंग्रजीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी मोबाइल अॅपद्वारे कार्य करते. या अॅपद्वारे तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात ते परत मिळतात. तुम्ही UPIद्वारे बिले भरू शकता, ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता आणि नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी मोबाइल नंबर बँक खात्याशी जोडलेला असायला हवा.

RBI: EMIमध्ये दिलासा नाही, व्याज दरातही बदल नाही, शक्तिकांत दास म्हणाले, अर्थव्यवस्था रुळावर येतेय

एक खाते अनेक फायदे; जाणून घ्या पीपीएफ खात्यामधील गुंतवणुकीचे फायदे

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.