सापांकडे खरंच नागमणी असतो का? जाणून घ्या नागाच्या डोक्यावर चमकणाऱ्या त्या वस्तुचं नेमकं रहस्य काय आहे?
मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुझफ्फरपूरमध्ये असलेल्या साहिबगंज नावाच्या शाळेत एका नागाने एक स्फटिकासारखी वस्तू सोडली आहे. ही स्फटिकासारखी दिसणारी वस्तू नागमणी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुझफ्फरपूरमध्ये असलेल्या साहिबगंज नावाच्या शाळेत एका नागाने एक स्फटिकासारखी वस्तू सोडली आहे. ही स्फटिकासारखी दिसणारी वस्तू नागमणी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही शाळा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र खरोखर नागमणी असतो का? की ही स्फटिकासारखी दिसणारी वस्तू आणखी दुसरं काही असतं याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
नागमण्याचा उल्लेख प्राचीन लोककथांमध्ये आढळतो. मात्र या नागमण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये, सर्पतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनाही नागाजवळ अशी कोणतीच वस्तू आढळून आलेली नाहीये, विज्ञान स्पष्टपणे नागमण्याच्या अस्तित्वाला नाकारतं, नाग किंवा नागिनीकडे असा कोणत्याही प्रकारचा मणी नसल्याचं विज्ञान सांगतं, मात्र अनेकदा नागमणी सापडल्याचा दावा केला जातो, मात्र तो नागमणी नसल्याचं सिद्ध झालं आहे.
मात्र साप अनेकदा क्रिस्टल किंवा काचेसारखे दिसणारे काही छोटे कण किंवा तुकडे जमिनीवर सोडतात, यालाच नागमणी असल्याचा दावा केला जातो. मात्र ते नागमणी नसतात तर हा नेमका काय प्रकार आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
काही विशिष्ट प्रकारचे साप जसं की कोब्रा अर्थात नागाच्या डोक्यावर चमकदार गोलाकार खवले असतात जे सूर्याच्या प्रकाशामध्ये कधीकधी चमकतात, त्यामुळे ते नागाच्या डोक्यावर एखादं रत्न आहे, असा भास होतो, यालाच अनेकजण नागमणी म्हणतात. तर काही प्रकरणामध्ये सापाच्या पोटात आढळणारे छोटे-छोटे दगड जो साप आपली कात उतरवत असताना जमिनीवर सोडतो, ते चमकतात त्यालाच अनेक जण नागमणी समजण्याची चूक करतात.
तुम्हाला कधीकधी सापाजवळ जे स्पटिकासारखे पदार्थ दिसतात ते नागमणी नसून, सापाच्या शरीरातून निघणारा एक विशिष्ट प्रकारचा प्रोटिनयुक्त पदार्थ असतो, त्यालाच लोक नागमणी समजण्याची चूक करतात. अनेकजण तर हा नागमणी असल्याचा दावा करून तो इतरांना प्रचंड किंमतीमध्ये विकतात देखील, मात्र अशा कोणत्याही दाव्याला न फसण्याचं आवाहन करण्यात येतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
