हैदराबाद : आसामहून तेलंगणात होणाऱ्या सोने तस्करीवर हैदराबाद महसूल गुप्तचर संचलनालयाने (Directorate of Revenue Intelligence) मोठी कारवाई केलीय. या कारवाईत आरोपींकडून परदेशी ब्रँडचे जवळपास 24 किलो सोने जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची बाजारातील किंमत तब्बल 11 कोटी 63 लाख रुपये इतकी आहे. हैदराबादमध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे (DRI seized 24 kg of gold from Guwahati near Hyderabad 3 accused arrested).