AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी दिवाळी कुणाच्याच नशिबी येवू नये; बस मध्ये दिवे लावले आणि ड्रायव्हर, कंडक्टरच्या आयुष्याची राख झाली

दिवाळी दिवशी असं काही तरी घडेल याची या दोघांना कल्पनाही नव्हती.

अशी दिवाळी कुणाच्याच नशिबी येवू नये; बस मध्ये दिवे लावले आणि ड्रायव्हर, कंडक्टरच्या आयुष्याची राख झाली
| Updated on: Oct 25, 2022 | 11:15 AM
Share

रांची : प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे. मात्र, याच दिव्यांनी घात केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बसमध्ये दिवे लावले. मात्र, याच दिव्यांमुळे त्यांचे आयुष्य राख झाले आहे. बसने पेट घेतल्याने आगीत होरपळून या दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवाळी दिवशी असं काही तरी घडेल याची या दोघांना कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात ही घटना घडली आहे.रांची लोअर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील खडगर्हा बसस्थानकात ही थरारक घटना घडलेय. बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला आहे.

ही बस नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या इच्छित स्थळी रवाना होणार होती. यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवाळीच्या रात्री बसमध्ये पूजा केली.

देवाच्या मूर्तीची पूजा करुन त्यांनी बसमध्ये दिवे लावले. पूजा झाल्यावर दोघेही जवले आणि नेहमीप्रमाणे बसमध्ये झोपले. काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली.

बसमध्ये लावेल्या दिव्याच्या ज्योतीने आग पेटली. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या कचाट्यात सापडली.बसला चारही बाजूने आगीने वेढले. आगीच्या झळांमुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरला जाग आली. मात्र, बस पूर्णपणे पेटली अससल्याने त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. या घटनेत दोघेही जिवंत जाळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ दोन्ही अर्धवट जळालेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.