‘Duologue with Barun Das’ सिझन 4 चा उद्यापासून दणक्यात प्रारंभ, विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी

'Duologue with Barun Das' चा चौथा सीझन २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होईल. हा शो मनोरंजनापेक्षा बरेच काही देतो,यात विचारांची देवाणघेवाण होते. बरुण दास सूत्रसंचालन करीत असलेल्या या शोमध्ये सौरव गांगुली आणि आमिर खानसारखे दिग्गज श्रोत्यांच्या भेटीला येणार आहेत.

‘Duologue with Barun Das’ सिझन 4 चा उद्यापासून दणक्यात प्रारंभ, विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी
‘Duologue with Barun Das’ Season 4
| Updated on: Feb 27, 2026 | 8:09 PM

‘Duologue with Barun Das’ चा चौथा सिझन पुन्हा एकदा दर्शकांसमोर येत आहे. हा नवीन सिझन २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. आधीच्या तीन सिझनला मिळालेल्या यशानंतर आता हा शो आणखीनच भव्य स्वरुपात सादर होणार आहे. यंदा अशा मुलाखती पाहायला मिळतील ज्यात केवळ मनोरंजनच नाही तर तुम्हाला विचार प्रवृत्त करणारे नवे काही मिळेल. हा शो सर्वसाधारण शोपासून वेगळा आहे. कारण यात केवळ प्रश्न आणि उत्तरे असत नाहीत, कर खोलवर विचारांचे अदान प्रदान होत असते. येथे समाज, काळ आणि जगाशी जुळलेल्या महत्वांच्या मुद्यांवर चर्चा होते, ज्यामुळे प्रेक्षकांना नवा विचार आणि नवीन दृष्टी मिळते.

Radico द्वारा प्रस्तुत या शोची खासियत म्हणजे यात अशा लोकांना पाचारण केले जाते. ज्यांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात मोठी ओळख केलेली आहे. हे लोक आपल्या अनुभवांद्वारे आजच्या काळात गरजेच्या प्रश्नावर बातचीत करतात. शोचा हेतून केवळ बातचीत करणे असा नसून, त्याऐवजी हे समझने देखील आहे की आजची दुनिया कोणत्या दिशेने जात आहे. आणि त्यास चांगले कसे करता येईल. प्रत्येक एपिसोडमध्ये अशी चर्चा होते जी प्रेक्षकांना जोडते आणि त्यांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी देते. हेच कारण आहे की हा शो हळूहळू एक मोठ्या विचार मंचाच्या स्वरुपात पुढे आला आहे.

बरुण दास आणि खास पाहुण्यांसोबत अनोखा संवाद

या खास शोचे सुत्रसंचालन TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास करतात. त्यांच्या बोलण्याचा अंदाज साधा सोपा असला तरी समोरच्याला ते सहज बोलते करतात.खेळ, सिनेमा, फॅशन आणि अन्य क्षेत्रातील मोठ्या हस्ती या शोमध्ये सहभागी होतात आणि आणि आपले अनुभव शेअर करतात. वरुण दास यांच्या मते त्यांना या शोने खूप काही शिकवले आहे. या मुलाखतींद्वारे प्रेक्षक आणि श्रोत्यांना देखील या महान हस्तींना जवळून समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे हा शो केवळ मुलाखती नाही तर एक चांगला संवाद बनतो.

सिझन ४ मध्ये दिसेल विविध क्षेत्रांचा शानदार संगम

यावेळच्या सिझनमध्ये ही विविध क्षेत्रातील दिग्गज सामील होतील.हीच विविधता या शोची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक पाहुणे त्यांचे वेगळे विचार आणि अनुभव घेऊन येतात. त्यामुळे प्रत्येक एपिसोड नवीन आणि खास बनतो. शोचे उद्देश्य केवळ सफल कहाणी सांगणे नाही, तर त्या आव्हानांना समोर आणणे आहे ज्यांच्यावर मात करुन हे लोक पुढे गेले आहेत. यामुळे प्रेक्षकांनाही यातून प्रेरणा मिळते आणि ते त्यांच्या जीवनात देखील सकारात्मक बदल आणण्यासाठी पावले पुढे करतात.

पहिल्या एपिसोडपासूनचे सिझन ४ ची जोरदार सुरुवात

सिझन ४ ची सुरुवात भारतीय क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तीमत्व माजी कर्णधार सौरव गांगुली सोबत होणार आहे, जे नेतृत्वगुण आणि जिद्दीपणासाठी ओळखले जातात. त्यानंतर टेनिस खेळाडू आणि अभिनेता विजय अमृतराज यांची भेट होणार आहे. फुटबॉल प्रेमींसाठी लोथर मॅथॉस यांच्या सोबत खास बातचीत होईल, त्यांनी १९९० फिफा वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या टीमला विजयी केले होते. तसेच फॅशन जगतातील प्रसिद्ध हस्ती बियांका बाल्टी आपला प्रवास कथन करतील. सिझनचा शेवटची मुलाखत प्रसिद्ध अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या सोबत होईल. या मुलाखतीने या सिझनची सांगता होईल.

ज्ञान, प्रेरणा आणि मनोरंजनाचा एक अनोखा संगम

एकंदरीत, डायलॉग्ज विथ बरुण दासचा चौथा सिझन पुन्हा एकदा प्रेक्षकांना ज्ञान, प्रेरणा आणि मनोरंजनाचा एक अनोखा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो फक्त पाहण्याचाच नाही तर दिग्गजांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक आदर्श शो आहे. हा नवा सिझन पूर्वीच्या सिझनपेक्षाही अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना काही तरी नवा विचार देईल अशी आशा आहे.

 

Follow Us