Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी INS विक्रांतमुळे पाकिस्तानाचे धाबे का दणाणले ते मोठं सत्य आलं समोर
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी INS विक्रांतने एक महत्त्वाची भूमिका बजावली. आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. या महाकाय जहाजाने 7 मे ते 10 मे या चार दिवसात समुद्रात काय केलं? त्या पराक्रमाची माहिती समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय नौदलाने आपल्या ताकदीच जबरदस्त प्रदर्शन केलं. नौदलाने पाकिस्तानवर कुठलाही हल्ला केला नाही. पण जी तयारी दाखवली, त्याने पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असेल. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांतवर 15 मिग-29 के फायटर जेट्स तैनात होते. डेप्युटी चीफ ऑफ नेवल स्टाफ (DCNS) वाइस एडमिरल तरुण सोबती यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशच्या डॉ. आंबेडकर नगर येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित ‘रण संवाद-2025’ कार्यक्रमात नौदलाच्या तात्काळ आणि दृढ कारवाईबद्दल माहिती देण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 ते 10 मे 2025 दरम्यान ऑपरेशन सिंदूर चालवण्यात आलं.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. ऑपरेशन सिंदूर या हल्ल्याला प्रत्युत्तर होतं. यात हिंदू पुरुषांना लक्ष्य करुन 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली. ‘द रेसिस्टेंस फ्रंट’ (TRF) ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली. लश्कर-ए-तैयबाशी संबंधित ही दहशतवादी संघटना आहे. भारताने पाकिस्तानवर दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचा आरोप केला. 7 मे रोजी भारताने पाकिस्तानात मिसाइल हल्ले केले. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. पाकिस्तानचा दावा होता की, हे हल्ले नागरिक क्षेत्रात झाले, यात 31 मृत्यू झाले असा पाकिस्तानचा दावा होता.
अभेद्य सुरक्षा कवच त्यांना भेदता आलं नाही
केवळ दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चराला टार्गेट केल्याचा दावा भारताने केला. हे ऑपरेशन 10 मे रोजी संपलं. मात्र, त्याआधी तणाव वाढलेला. पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले. पण भारताच अभेद्य सुरक्षा कवच त्यांना भेदता आलं नाही. नौदलाचा रोल समुद्री ब्लॉकेड आणि टेहळणीचा होता.
96 तासांच्या आत सर्व युद्धनौका तैनात
पाकिस्तानसोबतच्या या संघर्षात नौदलाची भूमिका सुद्धा महत्वाची होती. “96 तासांच्या आत सर्व ऑपरेशनल समुद्री युद्धनौका समुद्रात तैनात झाल्या. कारण नेहमी सर्व जहाजं पूर्णपणे लोड नसतात. सर्व जहाजं आणि पाणबुड्यांना तयार करुन समुद्रात उतरवण्यात आलं” अशी माहिती वाइस एडमिरल सोबती यांनी दिली.
आयएनएस विक्रांतने काय केलं?
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आयएनएस विक्रांत ऑपरेशनच मुख्य केंद्र होतं. भारताची ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. या युद्धनौकेवर 15 मिग-29के फायटर जेट्स तैनात होते. सोबत डिस्ट्रॉयर, फ्रिगेट्स आमि पाणबुड्यांचा ताफा होता. विक्रांत कराचीच्या दक्षिणेला आंतरराष्ट्रीय समुद्रात तैनात झाली. त्यांनी डी फॅक्टो ब्लॉकेड स्थापित केलं, त्यामुळे पाकिस्तानी नौदलाला आपल्या बंदराच्या बाहेर हालचाल करताच आली नाही.
ही रणनिती यशस्वी ठरली
वाइस एडमिरल सोबती म्हणाले की, आम्ही विक्रांतवर 15 मिग-29के तैनात केले होते. त्यांचा उद्देश्य फॉरवर्ड आणि डिटरेंट पोस्चर ठेवणं होता. म्हणजे शत्रुच्या नौदलाला आमचे व्यापारी मार्ग रोखता येऊ नयेत. पाकिस्तानी नौदलाच्या मुसक्या आवळल्या होत्या. ही रणनिती यशस्वी ठरली.
