AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक का जाहीर केली नाही? निवडणूक आयोगाने सांगितले कारण

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार होते. परंतु केवळ जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली नाही.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक का जाहीर केली नाही? निवडणूक आयोगाने सांगितले कारण
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 16, 2024 | 3:52 PM
Share

महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार असल्याची बातमी सकाळी आली. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद ठेवली. त्यानुसारआज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. त्यात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.  जम्मू-काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभेची निवडणूक जाहीर केली गेली. महाराष्ट्र आणि झारखंडची जाहीर झाली नाही. महाराष्ट्राची निवडणूक का जाहीर केली नाही? हे निवडणूक आयोगाने सांगितले.

महाराष्ट्राची निवडणूक आता का नाही?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर न करण्याचे कारण निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीमुळे सुरक्षा दल त्याठिकाणी असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक त्यानंतर जाहीर करण्यात येईल. तसेच महाराष्ट्रात पाऊस, गणपती उत्सव आणि पितृपक्षामुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया जम्मू-काश्मीर आणि हरियाणानंतर करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. आता महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक जम्मू-काश्मीर आणि हरियाणीची प्रक्रिया झाल्यावर जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता होती. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. परंतु यंदा दोन्ही राज्यांत वेगवेगळ्या तारखांना मतदान आणि मतमोजणी होणार आहे.

कोणत्या राज्यात किती जागा

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

काश्मीरमध्ये 90 जागांवर होणार मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.

9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग