AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा, कुत्र्याबाबत धक्कादायक माहिती समोर

बंगळुरूमधील एका व्यक्तीनं आपण जगातील सर्वात महागडे कुत्रे विकत घेतल्याचा दावा केला होता. त्या व्यक्तीच्या घरावर आता ईडीनं छापेमारी केली आहे.

जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा, कुत्र्याबाबत धक्कादायक माहिती समोर
प्रतिकात्मक छायाचित्र
| Updated on: Apr 18, 2025 | 8:53 PM
Share

बंगळुरूमधील एका व्यक्तीनं आपण जगातील सर्वात महागडे कुत्रे विकत घेतल्याचा दावा केला होता. आपण खरेदी केलेल्या कुत्र्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचंही त्याने म्हटलं होतं. सतीश असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने केलेल्या दाव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. तो इतका चर्चेत आला की, त्याच्या घरावर आता ईडीनं छापा टाकला आहे. या व्यक्तीच्या चौकशीमधून ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ईडीनं या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. सतीशने आपण जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी केला असून, त्याची किंमत तब्बल 50 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज अंमलबजावणी संचालनालयानं त्याच्या घरावर छापा टाकला. जर या व्यक्तीच्या दाव्यानुसार त्याने पन्नास कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी केला असेल तर त्याने ते पैसे कसे दिले, त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न ईडीसमोर आहे, त्यामुळे त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली.

मात्र ईडीनं जेव्हा त्याचं बँक खातं तपासलं तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला, कारण पन्नास कोटींचा कोणताही व्यवहार त्याच्या खात्यामधून झालाच नव्हता. जर त्याने आपल्या बँक खात्यातून हा व्यवहार केला नाही तर मग त्याने यासाठी हवाला मार्गाचा उपयोग केला असावा असा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी समोरासमोर बसून सतीशची चौकशी केली.

या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीशने जो कुत्रा खरेदी केला आहे, तो कोणत्याही विदेशी प्रजातीचा कुत्रा नसून, देशी कुत्रा असल्याचं ईडीच्या प्राथमिक चौकशीमधून समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

एका वृत्तपत्राला दिलेला मुलाखतीमध्ये सतीश याने असा दावा केला होता की, आपण जो कुत्रा खरेदी केला आहे, त्याची किंमत पन्नास कोटी रुपये असून, हा जगातील सर्वात महागडा कुत्रा आहे. हा एक अत्यंत दुर्लभ प्राजातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा लांडग्यासारखा दिसतो, अमेरिकेमधून हा कुत्रा आपण खरेदी केल्याचं सतीशने म्हटलं होतं.

Follow Us
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्ली भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...