Tamilnadu Murder : अमेरिकेहून परतलेल्या वृद्ध जोडप्याची ड्रायव्हरकडून क्रूर हत्या, मृतदेह फार्महाऊसमध्ये पुरले

मयत जोडपे हे शनिवारी अमेरिकेहून आपल्या मुलीला भेटून भारतात परतले. त्यांचा ड्रायव्हर कृष्णा हा त्यांना विमानतळावर गाडी घेऊन न्यायला आला होता. मात्र हे जोडपे घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दाम्पत्याचा शोध घेण्यास सुरवात केली.

Tamilnadu Murder : अमेरिकेहून परतलेल्या वृद्ध जोडप्याची ड्रायव्हरकडून क्रूर हत्या, मृतदेह फार्महाऊसमध्ये पुरले
अमेरिकेहून परतलेल्या वृद्ध जोडप्याची ड्रायव्हरकडून क्रूर हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 4:59 PM

चेन्नई : तामिळनाडूतील बेपत्ता वृ्द्ध जोडप्याच्या हत्येचा उलगडा करण्यास चेन्नई पोलिसांना यश आले आहे. या जोडप्याच्या ड्रायव्हरनेच त्यांची क्रूर हत्या (Murder) करुन मृतदेह त्यांच्या फार्महाऊसमध्ये पुरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. कृष्णा असे हत्या करणाऱ्या आरोपी ड्रायव्हरचे नाव आहे. तर श्रीकांत आणि अनुराधा अशी हत्या करण्यात आलेल्या वृद्ध जोडप्याची नावे आहेत. याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. मात्र आरोपींनी या जोडप्याची हत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. चौकशीनंतरच आरोपींनी हे हत्याकांड का केले हे स्पष्ट होईल. चौकशीत दोघांनी मिळून वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मैलापूर येथील द्वारका कॉलनीतील घरात आरोपींनी दोघांची हत्या केली. तसेच नेमेली येथील जोडप्याच्या फार्महाऊसमध्ये मृतदेह पुरले असल्याचेही सांगितले. (Elderly couple returning from US brutally murdered by driver, bodies buried in farmhouse)

अमेरिकेहून भारतात परतले मात्र घरी पोहचलेच नाहीत

मयत जोडपे हे शनिवारी अमेरिकेहून आपल्या मुलीला भेटून भारतात परतले. त्यांचा ड्रायव्हर कृष्णा हा त्यांना विमानतळावर गाडी घेऊन न्यायला आला होता. मात्र हे जोडपे घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दाम्पत्याचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांनी बेपत्ता जोडप्याची कॉल हिस्ट्री काढली. यात हे दोघे पती-पत्नी शेवटच्या वेळी ड्रायव्हर कृष्णासोबत होते, असे दाम्पत्याच्या फोन हिस्ट्रीवरून पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी या जोडप्याचा चालक कृष्णा आणि त्याच्या एका मित्राला अटक केली. कृष्णा हा मूळचा नेपाळचा रहिवासी आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट

फार्महाऊसवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी चेंगलपट्टू येथील सरकारी रुग्णालयात पाठवले. वृद्ध जोडप्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात उघड झाले. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास सुरू आहे. यासोबतच या दोघांनी वृद्ध दाम्पत्याची हत्या का केली ? याचाही शोध घेतला जात आहे. (Elderly couple returning from US brutally murdered by driver, bodies buried in farmhouse)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.