AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Elections 2021 : निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाकडून 5 राज्यांमध्ये आतापर्यंत 331 कोटी जप्त, कोणत्या राज्यात किती?

निवडणूक आयोगाने आगामी 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 331 कोटी रुपये जप्त केले आहेत.

Assembly Elections 2021 : निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाकडून 5 राज्यांमध्ये आतापर्यंत 331 कोटी जप्त, कोणत्या राज्यात किती?
Assembly election results 2021
| Updated on: Mar 17, 2021 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आगामी 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 331 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे निवडणूक प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणार होते. निवडणूक आयोगाने उमेदवार निहाय निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून बेकायदेशीरपणे मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळ्या पैशांचा उपयोग होतोय. त्यामुळेच ही कारवाई महत्त्वाची मानली जातेय. निवडणूक आयोग या पाचही राज्यांमधील निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या सर्व राज्यांमध्ये ही कारवाई केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय (Election Commission action against Money use in West Bengal Tamilnadu Keral Assembly Election 2021).

निवडणूक आयोगाने या आगामी निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून या राज्यांमध्ये 295 ऑब्जर्वरची (निरिक्षक) नियुक्ती केलीय. या कारवाईत रोख रक्कम, दारु, लाच, महागडं साहित्य आणि ड्रग्जचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली ही रक्कम याच राज्यांमध्ये 2016 मधील निवडणुकीत जप्त केलेल्या रकमेच्या कितीतरी अधिक आहे. विशेष म्हणजे यंदा या राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्याच टप्प्या आहे, त्यातच इतका खर्च झालाय.

या राज्यांमधील 2016 च्या निवडणुकीतही अशीच कारवाई, तेव्हा किती रक्कम जप्त?

2016 च्या निवडणुकीत या राज्यांमध्ये एकूण 225.77 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या निवडणुकीत काळा पैसा आणि दारुवर कारवाई करत निवडणूक आयोगाने यावर निर्बंध लावण्याचे प्रयत्न केलेत. सर्वात जास्त 127 कोटी रुपये रोख रक्कम तामिळनाडूतून जप्त करण्यात आलेत.

कोणत्या राज्यातून किती रक्कम जप्त?

निवडणूक आयोगाने या 5 राज्यांसाठी 5 विशेष खर्च निरिक्षकांची नियुक्त केलीय. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या कारवाईत आसाममध्ये रोख रकमेसह एकूण 63 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुडुचेरीतून 5.72 कोटी रुपये, तामिळनाडूतून 127.64 कोटी, केरळमधून 21.77 कोटी आणि पश्चिम बंगालमधून 112.59 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत.

हेही वाचा :

West Bengal Election 2021 : शुभेंदु अधिकारींचं दोन मतदारसंघातील मतदार यादीत नाव, TMCची कारवाईची मागणी

‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

West Bengal Election 2021 : ‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला, सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा

व्हिडीओ पाहा :

Election Commission action against Money use in West Bengal Tamilnadu Keral Assembly Election 2021

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.