AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : ‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला, सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा

ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात प्रचाराची राळ उठवली आहे. तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

West Bengal Election 2021 : 'मां, माटी और मानुष'वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला, सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा
| Updated on: Mar 16, 2021 | 5:59 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात प्रचाराची राळ उठवली आहे. तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.(Defense Minister Rajnath Singh criticizes West Bengal Chief Minister Mamata Banerjee)

ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्याकडून नोकरशाहीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच कोलकातामध्ये बसून कट रचला जात असल्याचंही ममता यांनी म्हटलंय. त्यावर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.

‘मां, माटी और मानुष, कुणीही सुरक्षित नाही’

“ममता यांनी सांगितलं होतं की, ‘मां, माटी और मानुष’! पण आज इथं ना मां सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे”, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र डागलं. त्यातबरोबर ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान अपघातामुळे जखमी झाल्या. त्यांनी भाजपवर आरोप केला. पण तपासात त्यांच्या सुरक्षेत कसूर झाल्यामुळे त्या जखमी झाल्याचं समोर आलं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

राजकीय हत्या रोखणार- राजनाथ सिंह

पश्चिम बंगालमध्ये एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन करा, मग टोलाबाजी करण्याची किंवा कट मनी घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, असा दावाही त्यांनी केलाय. भाजप सरकारच्या काळात कुणीही कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याची हत्या करु शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

ममता बॅनर्जी गप्प का?

तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये भाजपच्या जवळपास 150 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. आमचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते जखमी झाले. पण याबाबत ममता बॅनर्जी बोलायला तयार नाहीत. गरीब, आदिवासी, दुर्लक्षित समाजासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या योजनाही ममता बॅनर्जी यांनी लागू केल्या नाहीत, अशी टीका राजनाथ यांनी केलीय.

ममता बॅनर्जींचा अमित शाहांवर निशाणा

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बांकुडातील मेजिया इथं आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. कोलकाता इथं बसून नोकरशाह विरोधात कट रचला जात आहे. गृहसचिवांना नोटीस पाठवली जातेय. तर अनेक उद्योगपतींवर छापेमारी सुरु असल्याचा आरोप ममता यांनी केलाय.

पश्चिम बंगालच्या जनतेला माहिती आहे की, ते ममता बॅनर्जी यांना रोखू शकत नाहीत. अशावेळी कोलकाता इथं बसून गृहमंत्री कट रचत आहेत. गृहसचिवांना नोटीस पाठवली जात आहे. निवडणूक काळात त्यांना का परेशान केलं जात आहे? सर्वांना बंद करता येईल, असं अमित शाह यांना वाटतंय का? निवडणूक आयोग कोण चालवतंय? अमित शाह तर चालवत नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर टीकेचा भडीमार केलाय.

संबंधित बातम्या :

West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक

West Bengal Election 2021 : ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!

Defense Minister Rajnath Singh criticizes West Bengal Chief Minister Mamata Banerjee

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.