AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, 12 जागांसाठी निवडणूक; भाजपचे 8 खासदार होणार निवृत्त, जाणून घ्या वेळापत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेत 12 जागांसाठी निवडणूक होणार असून भाजपचे 8 खासदार निवृत्त होणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, 12 जागांसाठी निवडणूक; भाजपचे 8 खासदार होणार निवृत्त, जाणून घ्या वेळापत्रक
rajya sabha electionImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 1:28 PM
Share

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांवरील निवडणुकीनंतर आता राज्यसभेच्या एकूण 12 जागांवर निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात उत्तर प्रदेशातील एकूण 10 जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

भाजपचे 8 खासदार होणार निवृत्त 

उत्तराखंडच्या एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होईल. उत्तराखंडमधून भाजपचे नरेश बन्सल निवृत्त होणार आहे. या व्यक्तीरिक्त टीएमसी खासदार रुक्मिणी मलिक यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालच्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा 25 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यात भाजपच्या 8 खासदारांचा समावेश आहे. तर प्रत्येकी एक बहुजन समाज पार्टी आणि एक समाजवादी पार्टीच्या खासदाराचा समावेश आहे. भाजपचे नरेश बन्सल, बृजलाल, समी द्विवेदी, चंद्रप्रभात, हरदीप सिंह पुरी, नीरज शेखर, अरुण सिंह, बीएल वर्मा यांचा कार्यकाळ संपत आहे. समाजवादीचे राम गोपाल यादव आणि बसपाचे खासदार रामजी निवृत होत आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 28 जागांवर निवडणूक 

निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 29 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. यानंतर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हा 6 ऑक्टोबर रोजी असेल. उमेदवार 9 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. निवडणुकीत 16 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदानाचा कार्यक्रम असेल. तर त्याच दिवशी मतमोजणी होईल. त्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने चार राज्यातील 28 विधानपरिषदेच्या जागांवरही निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील 11 जागा, बिहारच्या 8, महाराष्ट्रातील 5, कर्नाटकातील 4 जागांचा समावेश आहे. अशा एकूण 28 जागांवर 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 4 पर्यंत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, संबंधित विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात कोणत्या पक्षाकडून कोणला कोणत्या जागेवर उमेदवारी मिळते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार