AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Kishor : काँग्रेसला ‘सल्ला’ देणार, ‘साथ’ नाही; प्रशांत किशोर यांची काँग्रेसमध्ये न जाण्याची 5 कारणे कोणती?

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात जाण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यांच्यासमोर काँग्रेसने सक्षम कृती गटाचा भाग म्हणून पक्षात सामील व्हा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

Prashant Kishor : काँग्रेसला 'सल्ला' देणार, 'साथ' नाही; प्रशांत किशोर यांची काँग्रेसमध्ये न जाण्याची 5 कारणे कोणती?
प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 26, 2022 | 6:54 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होत होती. दरम्यान प्रशांत किशोर यांनी दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेटही घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक वरिष्ठ बैठक बोलावली होती ज्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. तर त्यावेळी 2024 ला होणाऱ्या निवडणूकिसंदर्भात रोडमॅप ही सादर केला होता. मात्र त्यानंतर असे काही झाले की, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश आधीच काँग्रेसला रामराम केला आहे. तर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला (Randeep surjewala) यांनी ट्विट करून याची माहिती देत प्रशांत किशोर यांच्या चर्चेंना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ही, आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्ट केले होते.

सक्षम कृती गटाचा भाग

देशात सर्वात जुन्या असणाऱ्या पक्षाला सध्या घरघर लागली असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला होता. तर काँग्रेस पक्षात जाण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यांच्यासमोर काँग्रेसने सक्षम कृती गटाचा भाग म्हणून पक्षात सामील व्हा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो न पटल्याने प्रशांत किशोर यांनी तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम लागला आहे.

चर्चा तुटण्याची पाच प्रमुख कारणे

1. प्रशांत किशोर यांना मोठ्या धमाकेदार सुधारणा घडवून आणण्यासाठी मोकळा हात हवा होता. जो काँग्रेसला सोयीचा वाटला नाही. त्याऐवजी, पक्षाने त्यांना 2024 च्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे काम सोपवलेल्या समितीमध्ये स्थान देऊ केले.

2. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी किशोर यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यावर राहुल गांधी नाखूष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

3. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रचना आखणारे प्रशांत किशोर यांच्याबद्दल काँग्रेसकडे अविश्वासाचे मुद्दे होते.

4. काँग्रेसमधील एका वर्गाने किशोर यांच्या “वैचारिक” बांधिलकीचा अभाव असल्याचे नमूद केले होते. तर त्यांनी त्याचा संबंध तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षाशी आयपीएसीच्या कराराकडे जोडला. मात्र किशोर यांचे आता IPAC या संस्थेशी कोणतेही औपचारिक संबंध नाहीत, ज्याची त्यांनी एकेकाळी स्थापना केली होती.

5. तर काँग्रेसमधील बदलांना पक्षातीलच दिग्गजांचा विरोध असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच प्रशांत किशोर यांनी जे मुद्दे मांडले होते त्यात नेतृत्व बदलाचा मुद्दा होता. ज्यामध्ये पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, कार्यसमितीसह प्रमुख संघनेतील बहुतेक नेत्यांचा समावेश होतो.

इतर बातम्या :

Prashant Kishor on Congress: प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीच, सुरजेवाला यांच्या ट्विटमुळे सस्पेन्स संपला

Decree of Chief Yogi : केवळ तुमचीच नाही, तर पत्नी-मुलगा-मुलगी-सून यांच्याही मालमत्तेचा तपशील द्या, मुख्यमंत्री योगींचे फर्मान

CBSE Syllabus 2022: CBSE च्या सुधारित अभ्यासक्रमावरुन राहुल गांधींचा RSS वर हल्ला; म्हणाले, ही तर दडपशाही

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं