विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ, प्रद्युम्न सिंग तोमर यांच्या कृतीचे कौतुक

मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांनी एका सरकारी शाळेतील शौचालय साफ करत  स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तोमर हे सतत दौऱ्यावर असतात. त्यांनी आपल्या एका दौऱ्यामध्ये ग्वाल्हेरमधील एका शाळेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान शाळेतील शौचालय हे अस्वच्छ असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी लगेच ते शौचालय स्वच्छ केले.

विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ, प्रद्युम्न सिंग तोमर यांच्या कृतीचे कौतुक
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 9:28 AM

भोपाळ : मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांनी एका सरकारी शाळेतील शौचालय साफ करत  स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तोमर हे सतत दौऱ्यावर असतात. त्यांनी आपल्या एका दौऱ्यामध्ये ग्वाल्हेरमधील एका शाळेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान शाळेतील शौचालय हे अस्वच्छ असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी लगेचच हातामध्ये झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राज्यातील सर्व सरकारी शाळेतील शौचालये ही नेहमी स्वच्छ असावीत असा आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद

प्रद्युम्न सिंग तोमर हे आपल्या एका दौऱ्यानिमित्त ग्वाल्हेरला आले होते. यावेळी त्यांनी ग्वाल्हेरलाच्या हजीरा  परिसरातील शासकीय कन्या माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थीनींशी संवाद साधला. यापैकीच  एका विद्यार्थीनीने शाळेचे शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार मंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर तोमर यांनी  स्वत: हातात झाडू घेऊन हे  शौचालय साफ केले. तसेच राज्यातील सर्व शाळेतील शौचालयाची नियमीत स्वच्छता राखली जावी याबाबत देखील त्यांनी आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या या कृतीचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

अनेक स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग 

दरम्यान ऊर्ज मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांची स्वच्छता करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.  तर त्यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करताना ते अनेकदा आढळून आले आहेत. तसेच ते वेळोवेळी आपल्या कृतीमधून स्वच्छतेचा संदेश देत असतात.

संबंधित बातम्या 

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!

Bihar | दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?

Amit Shah: सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापन करणार नाही, अमित शहांनी सांगितला नवा प्लान!

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.