AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात नव्या व्यक्तीची एन्ट्री, श्रद्धाची हत्त्या होणार हे या व्यक्तीला माहिती होते?

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक अँगल मिळाला आहे. या हत्याकांडाची माहिती या व्यक्तीला होती का?

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात नव्या व्यक्तीची एन्ट्री, श्रद्धाची हत्त्या होणार हे या व्यक्तीला माहिती होते?
श्रद्धा वालकर हत्याकांड Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 27, 2022 | 8:50 PM
Share

नवी दिल्ली,  दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) एक मोठी माहिती हाती आली आहे. आता या हत्त्या प्रकरणात नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. तपासासंदर्भात महाराष्ट्रातील वसईला पोहोचलेल्या दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबचे वडील अमीन पूनावाला (Amin Punawala) दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. श्रद्धाचे 2020 चे तक्रार पत्र समोर आल्यानंतर, दिल्ली पोलिसांना संशय आहे की अमीन पूनावाला त्याचा मुलगा आफताबच्या सतत संपर्कात होता. यादरम्यान त्याने आफताबला श्रद्धाबद्दल का विचारले नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी आफताब जेव्हा पॅकर्स अँड मूव्हर्स एजन्सीद्वारे वसईहून दिल्लीला आपले सामान हलवत होता, तेव्हा तो त्याच्या घरी वडील आणि कुटुंबीयांना भेटायला गेला होता. त्याच्या वडिलांनी सामान हलवण्यात मदत केली का, याचा तपास सुरू आहे.

श्रद्धाचे पत्र समोर आले

श्रद्धाचे पत्र समोर आल्यानंतर आफताबच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती नव्हती का? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. कारण तो सतत आपल्या मुलाच्या  वाईट सवाईंना पाठीशी घालत होता.

ड्रग्जच्या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत

दिल्ली पोलिस ड्रग्जच्या अँगलनेदेखील तपास करत आहेत, कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यासाठी तो वसई, मीरा रोड आणि भाईंदरच्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता. सध्या न्यायालयाने आफताब अमीन पूनावाला याला शनिवारी 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हत्येनंतर आफताबच्या घरी आलेल्या महिलेचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?