5

आजपण सर्व पर्याय खुले, भारताने पाकिस्तानला थेट इशाऱ्यात पाहा काय म्हटलंय

India warn pakistan : भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यावर कडक शब्दात इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या समर्थनाशिवाय घुसखोरी होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या आर्मीचा ही यात सहभाग असल्याचं याआधीही समोर आलं आहे. यावर भारताने पाकिस्तानला खडसावलं आहे.

आजपण सर्व पर्याय खुले, भारताने पाकिस्तानला थेट इशाऱ्यात पाहा काय म्हटलंय
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 8:22 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत घुसखोरीवर आता मोदी सरकारने कडक शब्दात इशारा दिला आहे. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातून होणारी घुसखोरीची थांबली नाही तर भारतापुढे कारवाईसाठी सर्व पर्याय खुले असल्याचं भारताने ठणकावून सांगितलं आहे.

भारतीय सीमा भागातून घुसखोरी ही पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनाशिवाय होऊ शकत नाही. एलओसीच्या त्या बाजुला दहशवताद्यांचे प्रशिक्षण शिबीरे चालवली जातात. त्यानंतर भारतात हल्ले करण्याचा कट रचला जातो. सीज फायर करुन दहशतवाद्यांना भारतीय सीमेतून घुसखोरी करण्यासाठी मदत केली जाते. अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावलं आहे.

भारतपुढे आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तात्काळ प्रभावाने युद्धविराम संपवण्याचा पर्याय आहे. असं देखील भारताने कानउघडणी केली आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय देखील आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करु शकतो. तिसरा पर्याय म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात राहणारे लोकं भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत आणि अशा स्थितीत त्यांच्या आवाजाला पाठिंबा देऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार आहे. कोणतेही कठोर पाऊल उचलण्यासाठी मागे बघितले जाणार नाही.  उचलण्याच्या स्थितीत आहेत. कोणताही पर्याय नाकारता येत नाही आणि राजकीय नेतृत्वाला खात्री पटली की आम्ही कशासाठीही तयार आहोत, असे ते म्हणाले.

आपके लिए
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश, विद्यार्थ्यांनी साकारला झाडाचा गणपती
आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली
आदित्य ठाकरे यांची उंची किती? रामदास कदम यांनी उडविली खिल्ली
अजितदादा मन मोठं करा, 'त्यांना' माफ करा, बोललं कोण आणि माफीनामा कुणाचा
अजितदादा मन मोठं करा, 'त्यांना' माफ करा, बोललं कोण आणि माफीनामा कुणाचा