Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आज दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्यानं दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:24 AM, 15 Jan 2021
Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात 'शेतकरी अधिकार दिवस', राजभवन आणि LG ना घेराव घालणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीतही शेतकरी दिल्लीच्या रस्त्यांवर ठाण मांडून आहेत. अशा स्थितीत आज काँग्रेसकडून देशभरात शेतकरी आधिकार दिवस म्हणून पाळणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी सर्व प्रदेश काँग्रेसला राजभवन आणि केंद्र शासित प्रदेशातील एलजीच्या घरांना घेराव घालण्यास सांगितलं आहे.(Congress will cordon off Raj Bhavan and LG residences across the country today)

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आज दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्यानं दिली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चंदगी राम आखाडा इथं एकत्र जमण्यास सांगण्यात आलं आहे. तिथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नायब राज्यपालांच्या निवासस्थानी पायी मोर्चा काढला जाणार आहे.

‘केंद्राला कृषी कायदे परत घ्यावेच लागतील’

‘कृषी कायद्यामुळे देशातील मुठभर लोकांना फायदा होणार आहे आणि त्याची किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागणार आहे,’ अशी टीका राहुल गांधी यांनी गुरुवारी केलीय. केंद्र सरकारला हे कृषी कायदे परत घावेच लागतील, असा दावाही त्यांनी केलाय. कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांची फक्त उपेक्षाच करत नाही, तर शेतकऱ्यांना नष्ट करण्याची एक योजना आखत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकार आपल्या 2-3 मित्रांचा फायदा करु इच्छित आहे आणि तेच सध्या घडत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची 9वी फेरी

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसनं यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी 24 डिसेंबरला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. दरम्यान, केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आज 51वा दिवस आहे. आज दुपारी 12 वाजता कृषी मंत्रालयात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेची ही 9वी फेरी आहे.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीच्या समितीतून भूपेंद्रसिंग मान बाहेर

सुप्रीम कोर्टाची कृषी कायद्यांना स्थगिती, चार सदस्यीय समितीवर शरद पवारांचे मत काय?

Congress will cordon off Raj Bhavan and LG residences across the country today