AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीसाठी नेत असलेलं बोकड वाचलं, पण चौघांचा मृत्यू, कार थेट नदीत; काय घडलं?

पटेल कुटुंब पुजेनंतर बोकडाला बळी देण्यासाठी घेऊन निघाले होते. ते ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या भरधाव एसयूव्हीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला आहे.

बळीसाठी नेत असलेलं बोकड वाचलं, पण चौघांचा मृत्यू, कार थेट नदीत; काय घडलं?
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 7:38 PM
Share

मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जबलपूर परिसरामध्ये एका कारचा एसयूव्हीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे बळीसाठी चालवलेला बोकड या अपघातातून वाचला आहे. चौघांचा मृत्यू झाला मात्र पूजेनंतर बळी देण्यासाठी जो बोकड या गाडीमधून घेऊन जात होते तो बोकड सुरक्षितरित्या वाचला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की पटेल कुटुंब पुजेनंतर बोकडाला बळी देण्यासाठी घेऊन निघाले होते. ते ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्या भरधाव एसयूव्हीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि ही कार पुलाचा कठाडा तोडून तब्बल तीस फूट खोल कोरड्या नदीत कोसळली. या घटनेत पटेल कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र ज्या बोकडाचा बळी दिला जाणार होता, ते बोकड या अपघातामधून वाचलं आहे.

चारगव्हाण- जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. किशन पटेल वय 35, महेंद्र पटेल वय 35, सागर पटेल वय 17 आणि राजेंद्र पटेल वय 36 असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर जितेंद्र पटेल वय 36 आणि मनोज प्रातप हे दोघे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण नरसिंहपूरला गेले होते, तिथे बोकड आणि कोंबडं प्रतिकात्मकपणे अर्पण करून ते जबलपूरच्या दिशेनं परतत होते. घरी आल्यानंतर ते मटण आणि चिकणाचा कार्यक्रम करणार होते, मात्र वाटेतच काळानं घाला घातला.

बोकड सुरक्षित

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. कोंबड्याचा देखील मृत्यू झाला. मात्र बळीसाठी जे बोकड घरी चालवलं होतं ते सुरक्षित आहे, या अपघातामध्ये फक्त त्याच्या कानाला जखम झाली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा