AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 रुपयांचा ‘फ्री ट्रायल’ पडेल महाग! UPI AutoPay मुळे दरमहा बँक खात्यातून गायब होऊ शकतात 999 रुपये

आजकाल OTT प्लॅटफॉर्म्स, म्युझिक अ‍ॅप्स आणि AI टूल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अवघ्या 1 रुपयांमध्ये किंवा मोफत 'ट्रायल' देतात. मात्र, हा ट्रायल घेताना नकळत युजर्सकडून 'UPI AutoPay Mandate' ला मंजुरी दिली जाते. हा मोफत कालावधी संपताच, कोणतीही पूर्वकल्पना न मिळता बँक खात्यातून दरमहा 999 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम परस्पर कापली जाऊ लागते.

1 रुपयांचा 'फ्री ट्रायल' पडेल महाग! UPI AutoPay मुळे दरमहा बँक खात्यातून गायब होऊ शकतात 999 रुपये
UPI AutoPay
| Updated on: Aug 18, 2026 | 5:43 PM
Share

एस. कुलकर्णी : डिजिटल सेवा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या स्वस्त ट्रायलच्या मागे पैशांचा मोठा छुपा खेळ सुरू आहे. अनेक युजर्स ‘फ्री ट्रायल’च्या नादात UPI ऑटोपे फीचर अ‍ॅक्टिव्ह करतात. पुढे ट्रायल संपल्यावर सेवा बंद न केल्यास दरमहा बँक खात्याला मोठा फटका बसतो. त्यामुळे आपल्या गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम अ‍ॅपमधील ऑटोपे मॅंडेट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात एक नवीन आणि गंभीर आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. केवळ 1 रुपयांमध्ये विविध अ‍ॅप्स किंवा सेवांचा ‘फ्री ट्रायल’ घेताना नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे. युजर्सच्या नकळत त्यांच्या UPI अ‍ॅप्समध्ये ‘ऑटो-पे’ सुविधा अ‍ॅक्टिव्ह केली जाते आणि ट्रायल संपताच बँक खात्यातून हजारो रुपये परस्पर कापले जात आहेत.

अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाममात्र दरात सेवा देतात. मात्र, पेमेंट करताना बॅकएंडला एका मोठ्या रकमेचे ‘मँडेट’ (Mandate) सेट केले जाते. ग्राहक निष्काळजीपणाने किंवा अटी न वाचता याला मंजुरी देतात. यामुळे पुढील महिन्यापासून कोणतीही पूर्वसूचना किंवा OTP न येथे खात्यातून थेट पैसे वजा होतात. फसवणुकीची पद्धती कोणत्या?

आकर्षक जाहिराती: सोशल मीडियावर 1 किंवा 9 रुपयांमध्ये प्रीमियम सबस्क्रिप्शन देण्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. गुपित मँडेट: जेव्हा युजर 1 चे पेमेंट करतो, तेव्हा UPI अ‍ॅप (उदा. Google Pay, PhonePe, Paytm) बॅकएंडला एका ऑटो-डेबिट मँडेटची परवानगी मागतो. अवैध कपात: फ्री ट्रायलचा कालावधी (सामान्यतः 7 ते 30 दिवस) संपताच, युजरला न विचारता दरमह्याला मोठी रक्कम खात्यातून कापली जाते. युजरने ते मॅन्युअली बंद न केल्यास ही लूट सतत सुरू राहते.

सर्वात मोठा धोका म्हणजे 79-99 सारख्या लहान डेबिटमध्ये अधिक असतो. समजा, एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून दरमहा 79 रुपये वजा केले जात असतील, आता दिसायला ही रक्कम खूप कमी वाटू शकते. पण, असाच प्रकार अनेकदा झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं.

अशी तपासा आणि रद्द करा ‘AutoPay’ सेवा अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी आणि तुमच्या खात्यातून होणारी अवैध कपात थांबवण्यासाठी प्रमुख UPI अ‍ॅप्समध्ये खालीलप्रमाणे बदल करा.

Google Pay अ‍ॅप: सर्वप्रथम प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. ‘Autopay’ किंवा ‘UPI Mandates’ पर्याय निवडा. तेथे सुरू असलेल्या अ‍ॅक्टिव्ह सेवा तपासा आणि ‘Remove’ किंवा ‘Cancel’ करा. PhonePe अ‍ॅप: होम स्क्रीनवर डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. ‘Payment Settings’ अंतर्गत ‘Autopay’ पर्यायावर जा. नको असलेले सबस्क्रिप्शन निवडून ‘Remove Autopay’ वर क्लिक करा. Paytm अ‍ॅप: प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करून ‘UPI & Payment Settings’ मध्ये जा. खाली स्क्रोल करून ‘UPI Automatic Payments’ चा पर्याय निवडा. तेथे सुरू असलेले मँडेट निवडून ‘Pause’ किंवा ‘Cancel’ वर क्लिक करा.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात