AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3500 तासांचं उड्डाण, कारगिलचा अनुभव अन्…; नवे IAF चीफ आशुतोष दीक्षित नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या…

Air Marshal Ashutosh Dixit News: एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २९ वे हवाई दल प्रमुख असतील.

3500 तासांचं उड्डाण, कारगिलचा अनुभव अन्...; नवे IAF चीफ आशुतोष दीक्षित नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या...
| Updated on: Oct 06, 2026 | 8:17 PM
Share

निष्णात लढाऊ वैमानिक एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते ३१ ऑक्टोबर २०२६ पासून एअर चीफ मार्शल पदाचा कार्यभार स्वीकारतील. ते सध्याचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची जागा घेतील. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, राष्ट्रपतींनी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांच्या भारतीय हवाई दलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

अधिकृत आदेशानुसार, आशुतोष दीक्षित यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल. याचा अर्थ ते अंदाजे दोन वर्षे आणि दोन महिने भारतीय हवाई दलाचे नेतृत्व करतील. एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलातील एक प्रसिद्ध लढाऊ वैमानिक आहेत. त्यांना ऑपरेशनल आणि कमांड रोल्सचा व्यापक अनुभव आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, वीर पदक, आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, आशुतोष दीक्षित यांनी तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत ३,५०० तासांहून अधिक उड्डाण केले असून त्यांनी प्रमुख परिचालन आणि सामरिक पदे भूषवली आहेत. या काळात त्यांनी एचपीटी-३२, एएन-३२, एव्ह्रो, किरण, जॅग्वार, आयएल-७८, हॉक आणि तेजस यांसारखी विविध लढाऊ विमाने उडवली आहेत. नवीन हवाई दल प्रमुखांनी पाकिस्तानविरुद्धच्या १९९९ च्या कारगिल युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

९ व्या स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी लढाऊ विमानांमधून शत्रूच्या बंकर्सवर अचूक बॉम्बफेक केली. हवाई दलाने कारगिल युद्धादरम्यान ऑपरेशन सफेद सागर आणि ऑपरेशन रक्षक राबवले. एअर मार्शल आशुतोष दीक्षित १९८६ मध्ये भारतीय हवाई दलात फायटर स्ट्रीममध्ये कमिशन झाले. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले असून ते डिफेन्स स्टाफ सर्व्हिस कॉलेज (बांगलादेश) आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

वायुसेनेतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या, त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयातील त्यांची भूमिका… जिथे त्यांनी लष्कर, नौदल आणि वायुसेना यांच्यातील समन्वय मजबूत केला. एअर मार्शल दीक्षित यांचा जन्म ९ डिसेंबर १९६६ रोजी झाला. ६ डिसेंबर १९८६ रोजी ते हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या शाखेत अधिकारी म्हणून रुजू झाले.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!