AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताजमहालाच्या गेटवर फायरिंग, भाजप नेत्याला अटक

ताजमहालाच्या पश्चिम गेट परिसरात असलेल्या पार्किंगजवळ यलो झोन बॅरिअर परिसरात सोमवारी फायरिंगची घटना घडली होती, ज्या व्यक्तीनं फायरिंग केली, त्याला अखेर आता अटक करण्यात आली आहे.

ताजमहालाच्या गेटवर फायरिंग, भाजप नेत्याला अटक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2025 | 4:55 PM
Share

ताजमहालाच्या पश्चिम गेट परिसरात असलेल्या पार्किंगजवळ यलो झोन बॅरिअर परिसरात सोमवारी फायरिंगची घटना घडली होती, ज्या व्यक्तीनं फायरिंग केली तो भाजपचा नेता असल्याची माहिती आता समोर आली आहे. पंकज कुमार सिंह असं या व्यक्तीचं नाव असून, तो एलआयसी एजेंट देखील आहे. पोलिसांनी या प्रकरणात पंकज कुमार सिंह याला बेड्या ठोकल्या असून, त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पंकज कुमार सिंह याने ताजमहालाच्या परिसरात फायरिंग केली, त्यानंतर पोलिसांची नजर चकून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता, तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते, अखेर पंकज कुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे.

लखनऊ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, त्यानंतर त्याला आगरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून परवाना असलेली बंदूक आणि तीन काडतुसं जप्त केली आहेत. फायरिंग का केली याबाबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली तर त्याने पोलिसांनी सांगितलं की, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी फायरिंग केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी पंकज कुमार सिंह हा आपल्या कारनं ताजमहालाच्या पश्चिम गेटवर सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पोहोचला. आजमगढच्या बलरामपूर येथील रहिवासी असलेल्या पंकज कुमार याने आपण सरकारी अधिकारी असल्याचं सांगून ताजमहालाच्या गेटपर्यंत गाडी जाऊ द्या असं तेथील व्यवस्थापनाला म्हटलं. मात्र पोलिसांनी त्याला तिथून परत पाठवलं. त्यानंतर पंकज कुमार सिंह यांने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीमधून तीन राऊंड फायर केले, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आरोपी फायरिंग करून घटनास्थळावरून फरार झाला, पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेर लखनऊ पोलिसांनी पंकज कुमार सिंह याला अटक केलं, त्याला आगरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फायरिंग झाल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती. मला वाटलं म्हणून मी फायरिंग केली असं उत्तर आरोपीने पोलिसांना दिलं.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा