AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान

अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. मंगळवारपासून सुरू झालेल्या विधींची सांगता नवीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाने होईल.

आधी राम जन्मभूमी आणि आता राम मंदिर? वनवास संपणार कधी? प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही न्यायालयात आव्हान
RAM MANDIRImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 17, 2024 | 4:41 PM
Share

अलाहाबाद | 17 जानेवारी 2024 : अयोध्या येथील राम जन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाला देत ही राम जन्मभूमी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालानंतर येथे आता भव्य असे राम मंदिर बांधण्यात येत आहे. येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बंदी घालण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये मंगळवारी रामललाचा प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा सुरू झाला. यावेळी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. एकीकडे हे विधी सुरु असतानाच आता 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भोला दास यांनी ही याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत असे म्हटले आहे की, ’22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. रामललाची मूर्ती निर्माणाधीन मंदिरात बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजा करणार आहेत.

‘शंकराचार्य यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. पौष महिन्यामध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण मंदिरामध्ये कोणतीही देवता विराजमान होत नाही. त्यामुळे हा प्राण प्रतिष्ठा सोहळा हा सनातन परंपरेविरोधात आहे असे या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच, भारतीय जनता पक्षाने निवडणूक फायद्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

दरम्यान, अयोध्येच्या राम मंदिरात मंगळवारी रामललाचा अभिषेक सोहळा सुरू झाला. या काळात मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली अनेक विधी पार पडले. मंगळवारपासून सुरू झालेल्या विधींची सांगता नवीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकाने होईल.

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत ते 22 जानेवारीपर्यंत चालतील. 11 पुजारी सर्व ‘देवी-देवतांना’ आमंत्रण देणारे विधी करत आहेत. मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा हे या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत चालणाऱ्या या विधीचे यजमान आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच