30 रुपयांमध्ये आलिशान सुविधा, अॅम्बुलेन्स, हाय सिक्योरिटी…नव्या वंदे मेट्रोत काय काय?
Vande Metro: दे मेट्रो ट्रेनचे 23 किलोमीटरचे भाडे सुमारे 30 रुपये असेल. 27 किमीच्या प्रवासासाठी 35.7 रुपये मोजावे लागतील. अहमदाबाद ते भुज हे अंतर 352 किलोमीटर आहे, त्यासाठीचे भाडे 445 रुपये लागणार आहे. गुजरातनंतर मुंबई ते पुणे दरम्यान वंदे मेट्रो ट्रेन सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय रेल्वेची पहिली वंदे मेट्रो आजपासून धावत आहे. लहान आणि मध्य पल्यासाठी असणारी ही मेट्रो गुजरातमधील अहमदाबाद ते भुज दरम्यान ही मेट्रो सुरु होत आहे. 12 कोच असलेल्या वंदे मेट्रो 110 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या रेल्वेत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी ड्रायव्हर सीटजवळ स्ट्रेचर ठेवण्याची सुविधा आहे. थोडक्यात या ट्रेनमध्ये मध्यम अंतरासाठी अॅम्बुलेन्स आहे. वंदे मेट्रो ट्रेनचे 23 किलोमीटरचे भाडे सुमारे 30 रुपये असेल. 27 किमीच्या प्रवासासाठी 35.7 रुपये मोजावे लागतील. अहमदाबाद ते भुज हे अंतर 352 किलोमीटर आहे, त्यासाठीचे भाडे 445 रुपये लागणार आहे. गुजरातनंतर मुंबई ते पुणे दरम्यान वंदे मेट्रो ट्रेन सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वंदे भारत आणि वंदे मेट्रो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहे.
काय काय आहेत सुविधा
- वंदे मेट्रो ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक स्लाइड डोअर मॉड्युलर इंटीरियर, डिजिटल रूट मॅप इंडिकेटर, सीसीटीव्ही, फोन चार्जिंग सुविधा, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशनसह टॉयलेट्सने सुसज्ज आहे.
- प्रत्येक कोचमध्ये स्वयंचलित स्लाइड दरवाजे, पॅसेंजर टॉकबॅक सिस्टम, आग आणि धूर शोधण्याची यंत्रणा आहे. आग लागल्यास ट्रेनचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने या ट्रेनची रचना करण्यात आली आहे.
- सामान ठेवण्यासाठी रॅक, हँड होल्ड आणि डोअर हँढ रेलिंग तयार केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन अलार्म पुश बटण बसवण्यात आले आहे. प्रत्येक कोचमध्ये कोरड्या रासायनिक पावडरचे दोन अग्निशामक यंत्र बसवले आहेत.
- वंदे मेट्रो ट्रेनमध्ये 1150 लोकांसाठी आसन व्यवस्था आहे. 2058 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. ही वंदे मेट्रो ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल. 350 किमी अंतर अवघ्या 5 तास 45 मिनिटांत पूर्ण करेल.
- वंदे मेट्रोला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. रूट इंडिकेटर एलसीडी डिस्प्ले आहे. मोबाईल चार्जिंग सुविधा आणि रुंद काचेच्या खिडक्या आहेत. वंदे भारतच्या धर्तीवर ही ट्रेन करण्यात आली आहे.
- ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी प्रवाशांना मेट्रो ट्रेनचे तिकीट काउंटरवर मिळेल. या मेट्रो ट्रेनमध्ये वंदे भारत सारख्या आरामदायी आसने असतील.