AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu kashmir मध्ये इंडियन आर्मीच मोठं ऑपरेशन, एकाचवेळी इतक्या दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu kashmir : भारतीय सैन्याचा पराक्रम. भारतीय लष्कराने उधळले अतिरेक्यांचे नापाक मनसुबे. दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने आज चांगलाच धडा शिकवला. सध्या एन्काऊंटर झालेल्या ठीकाणी शोध मोहिम सुरु आहे.

Jammu kashmir मध्ये इंडियन आर्मीच मोठं ऑपरेशन, एकाचवेळी इतक्या दहशतवाद्यांचा खात्मा
encounter with security forces in Jammu kashmirImage Credit source: Representative image
| Updated on: Jun 16, 2023 | 10:58 AM
Share

श्रीनगर : मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवाया सुरु करण्याचा प्रयत्न आहे. अतिरेक्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करही तितकच सज्ज आहे. दहशतवादी कारवाया करण्याच्या इराद्याने भारतीय भूमीत घुसलेल्या नापाक दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने आज चांगलाच धडा शिकवला. जम्मू-काश्मीरमध्ये आज भारतीय सैन्यान मोठं ऑपरेशन केलं. दहशत माजवण्यासाठी आलेल्या अतिरेक्यांचा खात्मा केला.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्याने मिळून हे ऑपरेशन केलं. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

किती दहशतवादी ठार झाले?

दोघांनी मिळून केलेल्या या ऑपरेशनमध्ये पाच परदेशी अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. सध्या चकमक स्थळी शोध मोहिम सुरु आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. “पाच परदेशी दहशतवादी या ऑपरेशनमध्ये ठार झाले. शोध मोहित सुरु आहे” असं काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी एएनआयला सांगितलं.

स्पेशल टीप मिळालेली

उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या जुमागंड भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा पथकांनी ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी चकमक सुरु झाली. स्पेशल टीप मिळाली होती, त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.

याआधी किती दहशतवाद्यांचा खात्मा ?

13 जूनला तीन दिवसांपूर्वीच कुपवाड्यात एलओसीजवळ सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, असं पोलिसांनी सांगितलं. दोबानर माच्चल भागात ही चकमक झाली होती. याआधी 2 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एक दहशतवाद्याला एन्काऊंटरमध्ये सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातलं होतं.

Follow Us
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा
मोठी खळबळ! राजकारणातील कट्टर वैरी येणार एकत्र? बच्चू कडू आणि रवी राणा.
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार
शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार.
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर
एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर.
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर
बापरे! अशोक खरातच्या कार्यालयातून मिळाले 35... धक्कादायक माहिती समोर.
काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगलं...
काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगलं....
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी.
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर....
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर.....
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?.
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा.
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.