तीन महिन्यांनी आईच्या भेटीस आतुर, पाच वर्षांच्या चिमुरड्याचा एकट्याने विमान प्रवास

बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या हवाई प्रवाशांमध्ये पाच वर्षांचा गोंडस विहान होता. (Five year-old Boy flies alone from Delhi to Bengaluru airport)

तीन महिन्यांनी आईच्या भेटीस आतुर, पाच वर्षांच्या चिमुरड्याचा एकट्याने विमान प्रवास

बंगळुरु : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली प्रवासी हवाई वाहतूक आज (25 मे) सुरु झाली. पहिल्या दिवशीच्या प्रवाशांमध्ये पाच वर्षांचा चिमुरडा लक्षवेधी ठरला. विहान शर्मा नावाच्या मुलाने एकट्याने दिल्ली-बंगळुरु प्रवास करुन तब्बल तीन महिन्यांनी आईची भेट घेतली. (Five year-old Boy flies alone from Delhi to Bengaluru airport)

बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या हवाई प्रवाशांमध्ये पाच वर्षांचा गोंडस विहान होता. विहानने दिल्लीहून एकट्याने बंगळुरुला विमानाने प्रवास केला. विमानतळावर एकमेकांना पाहताच मायलेकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

“माझा पाच वर्षांचा मुलगा विहान शर्मा याने दिल्लीहून एकट्याने प्रवास केला, तीन महिन्यांनंतर तो बंगळुरुला परत आला आहे” अशी माहिती त्याच्या आईने एएनआयला दिली. बंगळुरु विमानतळावर अंदाजे 107 विमानांचे उड्डाण, तर सुमारे शंभर विमानांचे आगमन होणार आहे.

आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता संपूर्ण देशभरात विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फक्त 25 विमानांच्या उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे.

(Five year-old Boy flies alone from Delhi to Bengaluru airport)

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेश या हाय रिस्क कोविडबाधित राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थागत क्वारंटाईन व्हावे लागेल आणि त्यांना त्याचे शुल्क द्यावे लागेल, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ

गर्भवती, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, 80 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकाळापासून आजारी रुग्णांचे ‘कोरोना’ अहवाल निगेटीव्ह आल्यास होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी आहे.

(Five year-old Boy flies alone from Delhi to Bengaluru airport)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *