AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangzeb : औरंगजेब एक टोपी कितीला विकायचा? टोप्या विकून त्याने किती कमाई केली?

काही ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार औरंगजेब हा टोप्या विकून त्यातून आलेल्या पैशातून आपला दैनंदिन खर्च भागवत होता. तसेच यामधून जी बचत होईल, त्यातूनच आपले अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली होती.

Aurangzeb : औरंगजेब एक टोपी कितीला विकायचा? टोप्या विकून त्याने किती कमाई केली?
AurangzebImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 9:32 PM
Share

मोघल बादशाहा औरंगजेब हा त्याच्या प्रदीर्घ राजवटीसाठी आणि लष्करी मोहिमांसाठी ओळखला जातो. मात्र काही ऐतिहासिक कागदपत्रांनुसार औरंगजेब याने त्याच्या दैनंदिन खर्चासाठी कधीही शासकीय खजानाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तो टोपी विनायचा, त्या विकून तो आपला दैनंदिन खर्च भागवत होता. या टोप्या विकून त्याने जी बचत केली आहे, त्याच पैशांमधून आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत असे आदेश देखील त्याने दिले होते, असंही म्हटलं जातं. काही ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार औरंगजेबचं असं म्हणणं होतं की, कधीही आपल्या वैयक्तिक खर्चासाठी शासकीय खजानाचा वापर केला गेला नाही पाहिजे. त्यामुळेच त्या काळात त्याच्या हातात सत्ता असताना देखील तो शासकीय खजान्यामधून एकही रुपया घेत नव्हता असं म्हटलं जातं. तो नेहमी टोपी विनायचा आणि त्या टोप्या विकून जे पैसे जमा होत होते, त्यातून तो आपला खर्च भागवत होता.

एका टोपीची किंमत किती?

काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने त्याच्या हाताने विनलेली एक टोपी जवळपास 9 ते 10 आण्याला विकली जात होती. काही ऐतिहासिक दस्ताऐवजामध्ये तर ही टोपी त्या काळात तब्बल 4 ते 5 रुपयांना विकली जात होती, असा उल्लेख देखील आढळून येतो. औरंगजेबाने आपल्या हाताने तयार केलेल्या या टोप्या त्याच्या राज्यातील श्रीमंत लोक, त्याचे दरबारी लोक तसेच इतर राज्यातील श्रीमंत लोकं खरेदी करायचे असा उल्लेख आढळतो.

औरंगजेबाने टोप्या विकून किती पैसा कमावला?

औरंगजेबाने जवळपास 50 वर्ष राज्य केलं, त्याने या काळात शेकडो टोप्या विकल्या त्यातूनच तो आपला दैनंदिन खर्च भागवायचा असं मानलं जातं की जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा टोप्यांच्या विक्रीमधून त्याने 4 रुपये दोन आण्याची कमाई केली होती. त्याने याच बचतीमधून आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी इच्छा आपल्या मृत्यूपूर्वीच व्यक्त केली होती, त्यानंतर याच पैशांमधून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं मानलं जातं. तो आयुष्यभर टोप्या विनत होता.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे