भारताच्या या गावात अचानक घुसले अमेरिका, इंग्लडमधून आलेले फॉरेनर; ठोकला अख्ख्या गावावर दावा, ग्रामस्थांना एका बाजुला उभं केलं अन्…
हे सर्व लोक कॅनडा अमेरिका आणि इंग्लंडचे रहिवासी आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे तेथील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला.

ही घटना आहे, बिहारच्या भोजपूर गावची, या गावामध्ये अचानक पाच विदेशी व्यक्ती पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी असा दावा की हे आमचंच गाव आहे. गावात अचानक विदेशी लोक पोहोचल्यानं तेथील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी जेव्हा या लोकांची चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळालं की, हे सर्व लोक मॉरिशसचे पंतप्रधान सर नवीनचंद्र राम गुलाम यांचे वंशज आहेत. या लोकांना असं सांगण्यात आलं होतं की, ते भारतामधील हरीगावचे मुळनिवासी आहेत. त्यानंतर ते अथक प्रयत्न आणि दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्लॅनिंगनंतर थेट विदेशातून आपल्या गावी हरीगावला पोहोचले आहेत.
हे सर्व लोक कॅनडा अमेरिका आणि इंग्लंडचे रहिवासी आहेत. ते हरीगावला पोहोचले. त्यानंतर हे आपल्या पूर्वजांचं गावं असल्याचा दावा या लोकांकडून करण्यात आला आहे. इथे या लोकांनी मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र गुलाम यांचे वंशज आणि त्यांच्या शिक्षकांची भेट घेतली. हे सर्व जण प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी आले होते. तिथे त्यांनी स्नान केलं. त्यानंतर ते त्यांच्या पूर्वजांचं गाव असलेल्या बिहारमधील हरिगावला पोहोचले. या टीममध्ये एकूण पाच सदस्य आहेत. ज्यामध्ये जनेश्वर गौराह हे कॅनडामध्ये राहातात. तर जनेश्वर गौराह यांची पत्नी आणि भाऊ महिश्वर गौराह हे इंग्लंडला राहातात. तर सत्यवर गौराह हे अमेरिकेत राहातात. या पाचही जणांकडून आम्ही नवीनचंद्र राम गुलाम यांचे वंशज असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच त्यांनी हरीगावमध्ये त्यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली आहे. या लोकांना पाहून येथील ग्रामस्थांना सुरुवातीला मोठा धक्का बसला, सर्व गाव एका ठिकाणी गोळा झालं अन् त्यांची चौकशी करण्यात आली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांचे पूर्वज तब्बल 166 वर्षांपूर्वी या गावात राहात होते. ही त्यांची चौथी पिढी आहे. त्यांनी जेव्हा हरीगावला भेट दिली तेव्हा आपलं पूर्वजांचं गाव पाहून त्यांना खूप आनंद झाला. भारतीय प्रथा परंपरा आणि संस्कृतीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव असून, त्यांना भारत प्रचंड आवडतो. याच गावात मॉरिशसचे पंतप्रधान सर नवीनचंद्र राम गुलाम यांच्या आजोबांच्या नावानं एक हायस्कुल देखील बांधण्यात आलं आहे, या शाळेतील शिक्षकांची देखील या लोकांनी भेट घेतली.