हमारा बजाज मध्यमवर्गीयांच्या घरात पोहोचवणाऱ्या राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी अखेरचा श्वास

प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बजाज समूहाच्या उभारणीमध्ये (Bajaj Group) राहूल बजाज यांचे मोठे योगदान होते.

हमारा बजाज मध्यमवर्गीयांच्या घरात पोहोचवणाऱ्या राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी अखेरचा श्वास
राहुल बजाज
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 4:45 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बजाज समूहाच्या  उभारणीमध्ये (Bajaj Group) राहूल बजाज यांचे मोठे योगदान होते. राहुल बजाज यांचा जन्म दहा जून 1938 मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ (mba) देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा ही नीरज बजाज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बजाज उद्योग समुहाच्या माध्यमातून देशात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. राहुल बजाज यांनी या उद्योग समुहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून 2001 मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

बजाज यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

दरम्यान राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

राहुल बजाज यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय नेत्यांसोबतच उद्योग क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली, राहुल बजाज यांच्यासोबत माझ्ये गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध होते. बजाज ग्रुप वाढवण्यामध्ये राहुल बजाज यांचा मोठा वाट होता. आज राहुल बजाज यांचे निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्विट गडकरींनी केले आहे.

नितीन गडकरी यांचे ट्विट

संबंधित बातम्या

राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?

प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायत लढणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची खेळी?

गोव्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्था परिसरात छापेमारी, गांजा जप्त, एकाला अटक

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.