मध्यप्रदेश – भाजपच्या माजी नगरसेवकाने (bjp corporator) पत्नीसह दोन मुलांना विष पाजून आत्महत्या (suicide) केल्यामुळे मध्यप्रदेशात (madya pradesh) सगळीकडे चर्चा आहे. दोन्ही मुलांच्या आजारा कंठाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे सापडलेल्या चिठ्ठीत लिहीले आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली तेव्हापासून परिसरात एकदम शांतता पसरली आहे. ही घटना विदिशा शहरातील बंटी नगरमधील आहे. संजीव मिश्रा हे विदिशा नगरात नगरसेवक राहिले आहेत.