हरयाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांना 4 वर्षांची जेल, ओम प्रकाश चौटाला कोर्टातूनच पोलिसांच्या ताब्यात, उत्पन्नापेक्षा संपत्ती अधिक प्रकरण भोवलं

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा ठोठाण्यात आलीय.

हरयाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांना 4 वर्षांची जेल, ओम प्रकाश चौटाला कोर्टातूनच पोलिसांच्या ताब्यात, उत्पन्नापेक्षा संपत्ती अधिक प्रकरण भोवलं
ओम प्रकाश चौटाला, हरयाणाचे माजी मुख्यमंत्रीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:56 PM

हरयाणाचे (Hariyana) माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना चार वर्षांची शिक्षा ठोठाण्यात आलीय. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमलवल्याचा गुन्हा सिद्ध झाला होता. त्यानंतर त्यांना ही शिक्षा देण्यात आलीय. शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातच ओम प्रकाश चौटाला यांना ताब्यात घेण्यात (Om Prakash Chautala in Cutody) आलं. ओम प्रकाश चौटाला यांना 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय. एवढंच नाही तर चौटाला यांच्या चार संपत्तीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यात पंचकुला, गुरुग्राम, हेली रोड इथल्या प्रॉपर्टीजचा समावेश आहे.

प्रकरण नेमकं काय?

  1. -कमाईहून जास्त संपत्तीप्रकरणी 26 मार्च 2010 ला ओम प्रकाश यांच्यावर चार्जशीट जारी
  2. – 24 मे 1993 ते 31 मे 2006 दरम्यान मुख्यमंत्रीपदी
  3. – सीबीआयच्या म्हणण्यानुसार, काय काळात आपल्या पदाचा गैरवापर केला
  4. – पदाचा गैरवापर करुन कोट्यवधींची संपत्ती कमावली
  5. – त्यांच्याजवळच्या 6.09 कोटींच्या संपत्तीचा हिशोबच लागत नाही
  6. – चौटाला यांच्याजवळ त्यांच्या उत्पन्नाहून तब्बल 189.11 टक्के संपत्ती अधिक आहे
  7. – त्यानंतर त्यांच्यावर PMPLA कायद्यांतर्गत ED ने तपास सुरु केला
  8. – 2019 मध्ये ED ने 3.68 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली
  9. – पंचकुला, सिरसा, नवी दिल्लीतील फ्लॅट, एक प्लॉट, जमीन जब्त करण्यात आली
  10. – 2021 मध्ये कोर्टाकडून ओम प्रकाश चौटालांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले

चौटालांविरोधातील आधीची प्रकरणं-

  1. – जेटीबी शिक्षक भरती घोटाळ्यात 22 जानेवारी 2013 ला शिक्षा
  2. – भर्ती घोटाळ्यात तब्बल 7 वर्षांची तर गुन्हेगारी स्वरुपाचे कट रचण्यासाठी 10 वर्षांची शिक्षा
  3. – या प्रकरणात ओम प्रकाश यांच्याशिवाय अजय चौटाला आणि 53 लोकांना दोषी करार दिला गेला.
  4. – 2000 साली जेबीटी शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता,त्यात तब्बल 3206 शिक्षकांची भरती ही भ्रष्टाचार करुन करण्यात आली होती.
  5. – 2 जुलै 2022 ला चौटाला यांची शिक्षा पूर्ण केली आणि ते जेलबाहेर आले.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला?

ओम प्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार राहिले असून त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलंय. 2 डिसेंबर 1989 पासून 22 मे 1990, 12 जुलै 1990 ते 17 जुलै 1990, 22 मार्च 1991 ते 6 एप्रिल 1991 आणि 24 जुलै 1995 पासून 2005 पर्यंत ते मुख्यमंत्री होती. ओम प्रकाश चौटाला यांचे वडील जनता दल सरकारमध्ये उपपंतप्रधान होते. वडिलांनंतर ओम प्रकाश चौटाला पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर त्यांना पोटनिवडणुकांनाही सामोरं जावं लागलं होतं. एकूण तीन वेळा ओम प्रकाश चौटाला पोटनिवडणूक लढले होते.

पाहा व्हिडीओ : पालघरमध्ये भीषण अपघात

1996 साली के एन सैकिया आयोगानं चौटाला यांना आमीर सिंह हत्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यांच्याऐवजी तेव्हा बनारसी दास यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर दोनच महिन्यात चौटाला पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पक्षातीलच अंतर्गत गटबाजीमुळे पाच दिवसांतच चौटाला यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.