AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार? शासकीय प्रोटोकॉल काय सांगतो?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. येत्या १ जानेवारी २०२५ पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार? शासकीय प्रोटोकॉल काय सांगतो?
manmohan singh
| Updated on: Dec 27, 2024 | 2:05 PM
Share

former PM Manmohan Singh passes away : भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (26 डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गर्दी करताना दिसत आहे. काल रात्री एम्समधून त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. येत्या १ जानेवारी २०२५ पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तसेच कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) सकाळी 10-11 दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राजघाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी काही विशेष प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री उशिरा अमेरिकेहून दिल्लीला पोहोचेल. यानंतर त्यांचे पार्थिव उद्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. या ठिकाणी काँग्रेस नेते आणि दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार केले जातील.

माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी विशिष्ट प्रोटोकॉलचे पालन

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यावेळी त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात येतो. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवला जातो. यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते. यावेळी सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. यावेळी लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्ययात्रेत सहभागी होतात.

अंत्यसंस्कार कुठे होतात?

देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार विशेषत: दिल्लीतील स्मारक स्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पार्थिवावर राजघाट परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पण हे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांच्या धार्मिक पद्धतीनुसार होते. माजी पंतप्रधानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सहसा दिल्लीत होतात. काही वेळा ते अंत्यसंस्कार गृहराज्यातदेखील केले जातात.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक पार पडली. या सभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बेळगावी येथे होणारी सीडब्ल्यूसीची विशेष बैठक काँग्रेसने रद्द केली आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे सर्व नेते दिल्लीत पोहोचत आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.