AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलच्या दरात अचानक मोठी वाढ, आता भाजीपाला, दूध आणि फूड डिलिव्हरीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. डिझेल महागल्याने मालवाहतूक, भाजीपाला, दूध आणि अन्न वितरण सेवांवर कसा परिणाम होणार, याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

पेट्रोल-डिझेलच्या दरात अचानक मोठी वाढ, आता भाजीपाला, दूध आणि फूड डिलिव्हरीसाठी किती पैसे मोजावे लागणार?
inflation
| Updated on: May 17, 2026 | 1:25 PM
Share

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांपर्यंत मोठी वाढ करण्यात आली. या दरवाढीचा थेट फटका केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटवरही होणार आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, इंधनाच्या किमती वाढल्यामुळे येत्या काही महिन्यांत किरकोळ महागाई १० ते २५ बेसिस पॉइंट्सने वाढू शकते. हा परिणाम केवळ पेट्रोल पंपापुरता मर्यादित न राहता वाहतूक, अन्न वितरण (Food Delivery) आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवर दिसेल.

मालवाहतूक ३ टक्क्यांनी महागणार

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन (AITWA) च्या मते, डिझेल महाग झाल्यामुळे येत्या काही आठवड्यांत रस्त्याद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीचा खर्च २.५ टक्के ते ३ टक्क्यांनी वाढू शकतो. तसेच वाहतूक क्षेत्रावर आधीच इतर अनेक कारणांमुळे आर्थिक ताण आहे. बीएस-६ (BS-6) नियमांच्या गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड (युरिया) च्या किंमतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तसेच टायर, इंजिन ऑईल (वंगण), टोल टॅक्स आणि गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च सतत वाढत आहे.

‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकच्या एकूण खर्चापैकी ५० ते ५५ टक्के खर्च एकट्या डिझेलवर होतो. AITWA चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गोयल यांच्या मते वाहतूकदारांकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे हा वाढलेला खर्च ते कंपन्यांकडून आणि ग्राहकांकडून वसूल करतील म्हणजेच मालवाहतूक महाग होईल.

घरगुती बजेटवर कसा होणार परिणाम?

जेव्हा डिझेल महाग होते, तेव्हा कारखान्यातून किंवा शेतातून माल बाजारापर्यंत आणण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे येत्या काही दिवसात पुढील सेवा आणि वस्तू महाग होणार आहेत.

१. अन्नधान्य आणि भाजीपाला: शहरांमध्ये येणारा भाजीपाला आणि किराणा सामान महाग होऊ शकते. २. लॉजिस्टिक्स आणि अन्न वितरण: ऑनलाईन वस्तू किंवा जेवण घरपोच मागवण्याचा खर्च (Delivery Charges) वाढू शकतो. ३. दुधाचे संकट: बाजारात दुधाच्या किंमती आधीच जास्त आहेत. आता इंधन महागल्याने दूध संकलन आणि वाहतूक महाग होईल. ज्यामुळे दुधाचे दर आणखी वाढू शकतात.

महागाईचे संकट गडद होणार

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीचा दुहेरी फटका देशातील जनतेला बसणार आहे. एकीकडे प्रत्यक्ष इंधन खरेदीसाठी खिशाला कात्री लागणार असताना, दुसरीकडे मालवाहतूक महागल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही कडाडणार आहेत. आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सर्वसामान्यांचे मासिक बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. येत्या काळात जर सरकारने करकपात किंवा इतर उपायांद्वारे यावर नियंत्रण मिळवले नाही, तर बाजारातील मंदी आणि किरकोळ महागाईचे हे संकट अधिक गडद होऊ शकते.

Follow Us
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...