Hyderabad Crime : हैदराबादमध्ये पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सर्व आरोपीही अल्पवयीन

पबमध्ये भेटलेल्या या आरोपींनी तिला घरी सोडतो असे सांगून कारमध्ये बसण्यास सांगितले. या कारमध्ये आधीच 3-4 मुलं बसली होती. यानंतर आरोपींनी गाडी एका निर्जन ठिकाणी नेली. त्यानंतर एका-एकाने आधी मुलीला मारहाण केली आणि मग अत्याचार केला.

Hyderabad Crime : हैदराबादमध्ये पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सर्व आरोपीही अल्पवयीन
हैदराबादमध्ये पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 03, 2022 | 4:50 PM

हैदराबाद : पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुली (Minor Girl)वर मर्सिडीज कारमध्येच पाच अल्पवयीन आरोपीं (Minor Accused)नी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये 28 मे रोजी घडल्याचे उघडकीस आली आहे. सर्व आरोपी अकरावी आणि बारावी इयत्तेचे विद्यार्थी असून सर्वांची राजकीय पार्श्वभूमी आहे. पार्टीमध्ये एका आमदाराच्या आणि अल्पसंख्याक मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाची सहभाग होता. मात्र त्याचा या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही याबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळाला नाही. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन ज्युबली हिल्स पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Gang rape of a minor girl who went to a high profile party in Hyderabad)

हायप्रोफाईल पार्टीला गेली होती पीडित मुलगी

पीडित मुलीच्या मित्रांनी अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पबमध्ये 28 मे रोजी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला पीडितेलाही आमंत्रित करण्यात आले होते. पीडिता पार्टीला गेली होती आणि तेथेच तिची आरोपींसोबत ओळख झाली. पार्टीनंतर संध्याकाळी 5.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाली. पबमध्ये भेटलेल्या या आरोपींनी तिला घरी सोडतो असे सांगून कारमध्ये बसण्यास सांगितले. या कारमध्ये आधीच 3-4 मुलं बसली होती. यानंतर आरोपींनी गाडी एका निर्जन ठिकाणी नेली. त्यानंतर एका-एकाने आधी मुलीला मारहाण केली आणि मग अत्याचार केला. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणाही असल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी गुन्हा करण्याआधी एका पेस्ट्री शॉपमध्ये गेले होते.

सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरुंय

या घटनेनंतर पीडित मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. सध्या पीडिता फक्त एका आरोपीला ओळखू शकते आणि त्याचे नाव देऊ शकते. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी कलम बदलून बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पार्टीत सहभागी लोक आणि तिथे काम करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे. ही नॉन-अल्कोहोल पार्टी होती, असे पब व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. पार्टीला आलेल्या लोकांना दारू दिली जात नव्हती. जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Gang rape of a minor girl who went to a high profile party in Hyderabad)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें