AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टकडून निधी गोळा करण्याचं काम सुरु आहे.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी गौतम गंभीरकडून 1 कोटी रुपयांचा निधी
| Updated on: Jan 21, 2021 | 5:01 PM
Share

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टकडून निधी गोळा करण्याचं काम सुरु आहे. दरम्यान आज भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने मंदिराच्या निर्मितीसाठी स्वतःचं योगदान दिलं आहे. गंभीरने मंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. (Gautam Gambhir donated one crore rupees fo Ram Mandir construction)

गौतम गंभीरने गुरुवारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची भेट घेतली आणि मंदिरासाठीचा निधी ट्रस्टकडे सुपूर्द केला. ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद राम मंदिरासाठी देशभर निधी गोळा करत आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरु केले आहे. या अभियानाद्वारे देशभरातील 5 लाख कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे विश्व हिंदू परिषदेचे उद्दिष्ट आहे, जेणेकरुन राम मंदिरासाठी निधी उभा करता येईल.

राज्यपाल कोश्यारींकडून 1 लाख रुपयांचा निधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गेल्या आठवड्यात राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिला आहे. नागपुरात 15 जानेवारीपासून निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना राज्यपाल यांनी याबद्दल माहिती दिली होती. कोश्यारी यावेळी म्हणाले की, राम मंदिरासाठी खूप यात्रा निघाल्या, श्रीराम यांनी पूर्ण देशाला ऐक्यात बांधून ठेवले आहे. राम फक्त राम नाही आहे. तर आमच्या सर्वांसाठी एक राष्ट्र आहे, असंही राज्यपाल म्हणाले होते. कोश्यारी पुढे म्हणाले की, खूप मोठ्या संघर्षानंतर आम्ही राम मंदिर बनवत आहोत. मात्र, संकल्प अजून अपूर्ण आहे. आपल्याला देशात राम राज्य आणायचे आहे. देश एका योग्य दिशेत चालला आहे. प्रत्येक घरात जाऊन त्यांचे योगदान घ्यायचे आहे. भव्य दिव्य राम मंदिर तयार होणार. यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कामासाठी विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिर निर्माण सहयोग अभियान (मदतीची मोहीम) सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने 15 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह अनेक हिंदू संघटनांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीदरम्यान कोविंद यांनी मंदिरासाठी 500100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

उद्धव ठाकरे राम मंदिरासाठी तीन कोटी रुपये देणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येत गेले होते, तेव्हा त्यांनी राम मंदिराला 3 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी विहिंपकडून देण्यात आली आहे.

Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केला आहे. मंदिराचे बांधकाम लार्सन अँड ट्युबरो (Larsen & Toubro) कंपनी करणार असून Tata Consultancy ही कंपनी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.

संबंधित बातम्या

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी

(Gautam Gambhir donated one crore rupees fo Ram Mandir construction)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.