AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सोनमजी आता थांबा’, …तर माझ्या घरून जेवण पाठवतो, सलमान खानची आंदोलनावर दुसरी भावनिक पोस्ट

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानची भावनिक पोस्ट; विद्यार्थ्यांसह सोनम वांगचुक यांना देखील केली भावनिक विंनती. नेमकं काय म्हणाला सलमान?

'सोनमजी आता थांबा', ...तर माझ्या घरून जेवण पाठवतो, सलमान खानची आंदोलनावर दुसरी भावनिक पोस्ट
| Updated on: Jul 23, 2026 | 9:21 PM
Share

अभिनेता सलमान खानने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत त्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनाही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे.

सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका स्पष्ट केली. त्याने म्हटले की, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांची सुरक्षितता ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी कोणतीही चिंता करू नये असेही त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना घरी जाण्याचे आवाहन

आपल्या पोस्टमध्ये सलमान खानने म्हटलं की, ‘शिक्षण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत विद्यार्थी ही आपली पहिली प्राथमिकता आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. माननीय पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट केले आहे आणि मला विश्वास आहे की पेपर लीक प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या सर्वांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आपल्या पालकांकडे आणि घरी परत जा.’

सोनम वांगचुक यांनाही केली विनंती

सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा उल्लेख करत आंदोलन अधिक पुढे न नेण्याचे आवाहन केले. त्याने लिहिले की, ‘सोनम, आता पुरे झाले’, हे आंदोलन आणखी पुढे नेऊ नका. गरज पडली तर हा जाज्वल्य उत्साह दुसऱ्या दिवशीसाठी जपून ठेवा. मात्र, मला वाटत नाही की त्याची गरज भासेल. काहीतरी खा-प्या. तुम्हाला हवे असेल तर मी माझ्या घरून जेवणही पाठवेन.’ या भावनिक संदेशामुळे सलमान खानच्या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद

सलमान खानच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या भूमिकेचे कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. एका चाहत्याने लिहिले, सलमान सर, तुम्हीच देशाचे पंतप्रधान व्हायला हवे. दुसऱ्या चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘टायगर आला’.

सलमान खानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्याच्या भूमिकेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याने व्यक्त केलेल्या भावना आणि संयमाचे आवाहन याचे स्वागत केले आहे. तर काही जण या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच