Goa Municipal Election Results 2021 : गोव्यातील लोकांचा भाजपला पाठिंबा? बघा महापालिका निवडणुकीचा निकाल काय सांगतोय

गोव्यातील 6 नगरपालिका, पणजी सिटी कॉर्पोरेशनचे 30 वॉर्ड, 22 पंचायत वॉर्ड आणि जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी 20 मार्च रोजी मतदान पार पडलं होतं (Goa Municipal Election Results 2021).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:58 PM, 22 Mar 2021
Goa Municipal Election Results 2021 : गोव्यातील लोकांचा भाजपला पाठिंबा? बघा महापालिका निवडणुकीचा निकाल काय सांगतोय
प्रातिनिधिक फोटो

पणजी : देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत लोकांचा कल कुणाकडे असेल, लोक मोदी सरकारला अद्यापही स्वीकारतात की त्यांना दुसरा पर्याय हवाय हे येत्या काही दिवसात कळेलच. मात्र, गोव्यातील सर्वाधिक लोकांचा भाजपला पाठिंबा दिसतोय. कारण गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या पालिका निवडणुकीत (Goa Municipal Election Results 2021) 30 पैकी 25 जागांवर भाजप आणि त्याचे मित्रपक्ष आघाडीवर आहेत. तर फक्त पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.

कोण बाजी मारणार?

गोव्यातील 6 नगरपालिका, पणजी सिटी कॉर्पोरेशनचे 30 वॉर्ड, 22 पंचायत वॉर्ड आणि जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी 20 मार्च रोजी मतदान पार पडलं होतं (Goa Municipal Election Results 2021). त्यानंतर आज सकाळपासून मतमोजनीचं काम सुरु आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतमोजनीचं काम सुरु आहे. ही मतमोजनी आज संध्याकाळपर्यंत चालू राहील. त्यामुळे संध्याकाळपर्यंत गोव्यामध्ये नेमकी बाजू कोणी मारली हे स्पष्ट होईल.

कोरोना संकटामुळे निवडणुकीला उशिर

कोरोना संकटामुळे गोव्यातील महापालिका निवडणुकीला उशिर झाला. शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत मतदान करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 20 मार्चला एक नगर परिषद, सहा नगरपालिका आणि 17 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजनीचं काम सुरु आहे.

भाजपच्या बड्या नेत्याचा नेता निवडणुकीच्या रिंगणात

पणजीचे भाजप आमदार अतनासियो मोंसेरेट यांचा मुलगा रोहित मोंसेरेट हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अतनासियो यांनी तयार केलेल्या पॅनलला भाजपने पाठिंबा दिला आहे. अतनासियो हे आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र, 2019 मध्ये अतनासियो 10 आमदारांसह भाजपात सामील झाले.

हेही वाचा : Photo : हार्दिक पांड्याचं आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!