AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rates Today : सोने दणक्यात स्वस्त, मोठी घसरण, ताई, बाई, अक्का आजच खरेदी करा सोने, तब्बल..

Gold Rates Today : नुकताच आजचे सोने आणि चांदीचे भाव पुढे आलेत. सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा तब्बल 60 हजारांपेक्षा कमी झाले. सोने खरेदी करण्याची हीच मोठी संधी आहे.

Gold Rates Today : सोने दणक्यात स्वस्त, मोठी घसरण, ताई, बाई, अक्का आजच खरेदी करा सोने, तब्बल..
Gold Rates Today
| Updated on: Jun 19, 2026 | 11:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर सतत घसरताना दिसले. युद्धाला सुरूवात होताच दरांमध्ये चढउतार बघायला मिळाला. 28 फेब्रुवारीपूर्वी सोन्याचा दर जवळपास दोन लाखाच्या आसपास होता. मात्र, युद्धाला सुरूवात होताच दर घसरले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे जागतिक मार्केटमध्ये सोन्याचे दर घसरत असल्याचे सांगण्यात आले. आता युद्ध थांबले आहे. मात्र, सोने आणि चांदीच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर घसरत आहेत. त्यामध्येच आता मोठी घसरण सोन्याच्या दरात झाल्याचे बघायला मिळत आहे. ज्याने सोने खरेदीकडे लोक वळत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षाकरिता सोने खरेदी न करण्याचे आवाहन जनतेला केले होते. मात्र, सोन्याचे दर कमी होत असल्याने अनेकांनी सोने खरेदीवर भर दिला. मागील काही महिन्यातील सर्वात कमी दर सोन्याचा आता बघायला मिळतोय.

सोने त्याच्या उच्चांकापेक्षा सतत घसरताना दिसत आहे. आज सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात 4 हजार 600 रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल 15 हजार रूपयांनी घसरले. ही अत्यंत मोठी घसरण म्हणावी लागणार आहे.

सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 948 रुपये झाला तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 38 हजार 960 रुपये झाला. आज लोक मोठ्या संख्येने सोने खरेदी करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सोन्याच्या दरात सतत घसरण नोंदवली जात आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे दर वाढतील असा एक अंदाज होता.

प्रत्यक्षात उलटे घडत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतरही सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच आज विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. आज भारतीय सराफा बाजारात तेजी येऊ शकते. कारण लोक मोठ्या संख्येने आज सोन्याची खरेदी करू शकतात. गेल्या काही महिन्याच्या तुलनेत सोने चांगलेच घसरले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा