AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूश खबर, PF अकाऊंटबद्दलचा सर्वात मोठा निर्णय काय?

EPFO Latest News चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. याचा अर्थ आता तुमच्या पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याजदर दिला जाईल.

देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूश खबर, PF अकाऊंटबद्दलचा सर्वात मोठा निर्णय काय?
कर्मचारी भविष्य निधीImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 10, 2024 | 12:13 PM
Share

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO Rate of interest) च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी  खात्यासाठी व्याज दर जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. याचा अर्थ आता तुमच्या पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याजदर दिला जाईल. उल्लेखनीय आहे की, इपीएफओ ने गेल्या वर्षी 28 मार्च रोजी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. तर इपीएफओ साठी 8.10 टक्के व्याज दिले होते.

शनिवारी झालेल्या सीबीटीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

मार्च 2022 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-22 साठीचा व्याजदर 8.1 टक्के केला होता, जो गेल्या चार दशकांच्या तुलनेत कमी आहे. हा 1977-78 नंतरचा नीचांक होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT), EPFO मधील निर्णय घेणारी संस्था, शनिवारी झालेल्या बैठकीत, 2023-24 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ने मार्च 2021 मध्ये EPF वर 8.5 टक्के व्याजदर निश्चित केला होता.

अर्थ मंत्रालय जारी करेल अधिसूचना

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) शनिवारी EPFO च्या 235 व्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. वाढीव व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सूचित केले जाईल. यानंतर, EPFO द्वारे व्याजदराचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील.

VPF वर देखील लागू होईल वाढीव व्याजदर

अधिसूचना जारी झाल्यानंतर, VPF वर 8.25 टक्के व्याज दर देखील लागू होईल. याशिवाय, ज्या ट्रस्टला नियमांनुसार सूट मिळते ते देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढलेल्या EPFO दराचा लाभ देण्यास बांधील आहेत. 20 किंवा 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीत पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात गुंतवली जाते. त्याचप्रमाणे EPF मध्ये नियोक्त्याकडून समान योगदान दिले जाते.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.