तामिळनाडूत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याचं वय ६० वर्षे, महाराष्ट्रात काय स्थिती?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे.

तामिळनाडूत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याचं वय ६० वर्षे, महाराष्ट्रात काय स्थिती?
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 7:27 PM

मुंबई : तामिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे. पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत ही घोषणा केली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Government of Tamil Nadu decides to raise retirement age of government employees to 60)

तामिळनाडू सरकारचा हा निर्णय सरकारी, सहकारची सहाय्यता असलेल्या शैक्षणिक संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक महापालिका आणि 31 मे 2021 ला निवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षी मे मध्येच तामिळनाडू सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरुन 59 केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यात एका वर्षाने वाढ करण्यात आली आहे. सरकारचा हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होणार असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व सरकारी आस्थापनांना तो कळवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती ?

महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन मुख्य सचिवांनी ऑगस्ट 2020 मध्ये दिलं होतं. मात्र, ऑक्टोबर 2020 मध्ये राज्य सरकारी कर्मचारी आमि अधिकारी यांच्या सेवा निवृत्तीचे वय जैसे थे म्हणजेत 58 वर्षेच ठेवावं, अशी शिफारस निवृत्त सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या समितीनं केली आहे. समितीच्या या अहवालामुळे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी संघटनांना जबर धक्का बसला होता. समितीने दिलेला अहवाल अत्यंत एकांगी असून, तो शासनाने स्वीकारु नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघानं केली होती.

दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरुन 60 वर्षे करण्याचे सुतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करु असंही त्यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या :

ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मोठी बातमी: ठाकरे सरकारचे ‘ते’ पत्र काम साधणार; राज्यपालांना आमदारांची नियुक्ती करावी लागणारच?

Government of Tamil Nadu decides to raise retirement age of government employees to 60

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.