New GST Rates : या 34 वस्तूंवर 0 टॅक्स, मोदी सरकारची दिवाळी भेट; पहा संपूर्ण यादी
New GST Rates : आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू झाले आहेत. जीएसटी दरातील कपात ही मोदी सरकारची दिवाळी भेट असल्याचं म्हटलं जात आहे. नवीन जीएसटी दरांमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. काही वस्तूंवर थेट शून्य कर असेल.

New GST Rates : वस्तू व सेवा करातील (जीएसटी 2.0) नवीन द्विस्तरीय दररचना आजपासून (22 सप्टेंबर) लागू होत आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षापासून वार्षिक 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. शिवाय ‘जीएसटी 2.0’च्या सुलभीकरणामुळे दैनंदिन वापराच्या 99 टक्के वस्तू 5 टक्के कर टप्प्यात आल्या आहेत. आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू झाले आहेत. याअंतर्गत फक्त 5% आणि 18% हे दोन कर स्लॅब असतील. याशिवाय मोदी सरकारने सर्वसामन्यांना दिवाळीची भेट देऊन अनेक वस्तूंवर शून्य कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून खालील वस्तू करातून मुक्त असतील. या वस्तूंची यादी पहा..
या वस्तूंवर 0 टॅक्स
| क्रमांक | वस्तू |
| 1 | छेना- प्री पॅक्ड आणि लेबल्ड |
| 2 | UHT (Ultra-High Temperature) दूध |
| 3 | पराठा आणि इतर भारतीय ब्रेड (कोणत्याही ब्रँडचे) |
| 4 | पनीर प्री पॅकेट आणि लेबल्ड |
| 5 | पिज्झा ब्रेड |
| 6 | खाखरा, चपाती |
| 7 | एक्सरसाइज बुक |
| 8 | रबर |
| 9 | अनकोडेट पेपर आणि पेपरबोर्ड |
| 10 | ग्राफ बुक, लॅबोरेटरी नोटबुक आणि नोटबुक्स |
| 11 | एगल्सिडेस बीटा |
| 12 | अप्टाकोग अल्फा सक्रिय रीकॉम्बीनंट कोग्युलेशन फॅक्टर VIIa |
| 13 | ओनासेम्नोजीन अबेपरव्होवेक |
| 14 | इमिग्लूसेरेज |
| 15 | एस्किमिनिब |
| 16 | पेगीलेटेड लिपासोमल इरिनोटेकन |
| 17 | मेपोलिजुमाब |
| 18 | टॅक्सिस्टामॅब |
| 19 | डॅराटुमुमॅब / डॅराटुमुमॅब त्वचेखालील |
| 20 | अमिवंतामब |
| 21 | रिस्डिप्लाम |
| 22 | एलेक्टिनिब |
| 23 | ओबिनुटुजुमॅब |
| 24 | पोलातुझुमॅब वेडोटिन |
| 25 | एंट्रेक्टिनिब |
| 26 | एटेजोलिजुमाब |
| 27 | स्पेसोलिमॅब |
| 28 | वेलाग्लूसेरेज अल्फा |
| 29 | एगल्सिडेस अल्फा |
| 30 | रुरियोक्टोकॉग अल्फा पेगोल |
| 31 | इडुरसल्फेटेज |
| 32 | एल्ग्लूकोसिडेस अल्फा |
| 33 | लारोनिडेज |
| 34 | ओलिपुडेस अल्फा |
याशिवाय धान्य, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटे, काही चॉकलेट्स, कोको उत्पादने यांवरचा जीएसटी पाच टक्के असेल. तर सुका मेवा म्हणजेच काजू, खजूर, पिस्ते यांवरचा जीएसटी पाच टक्के असेल. खतेही स्वस्त होतील, कारण त्यावरचा जीएसटी हा 18 आणि 12 टक्क्यांवरून पाच टक्के इतका करण्यात आला आहे. शेतीच्या साधनांवरचा जीएसटीही 12 टक्क्यांवरून आता पाच टक्के असेल.
अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे ‘बचत उत्सव’ असून त्यामध्ये देशवासीयांनी सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून केलेल्या वीस मिनिटांच्या भाषणामध्ये केलं. मी स्वदेशी खरेदी करतो, मी स्वदेशी विकतो, ही भावना प्रत्येक देशवासीयांच्या मनात रुजली पाहिजे. तर विकासाला गती मिळेल, असं ते म्हणाले.
