Jignesh Mevani : जिग्नेश मेवाणी आणि रेश्मा पटेलला तीन महिन्यांचा तुरुंगवास; तर 1000 दंडही

उना येथील दलित मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर 12 जुलै 2017 रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आजादू कूच’ नावाने आंदोलन करण्यात आले होते.

Jignesh Mevani : जिग्नेश मेवाणी आणि रेश्मा पटेलला तीन महिन्यांचा तुरुंगवास; तर 1000 दंडही
आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:02 PM

महेसाणा (गुजरात) : गुजरातमध्ये (Gujarat) काँग्रेसला पाठिंबा देणारे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना महेसाणा न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. परवानगीशिवाय रॅली काढल्याने न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. मेवाणी (Jignesh Mewani) यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांनाही तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर याच प्रकरणात आणखी 12 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण सुमारे पाच वर्षे मागील असून 2017 मध्ये आझादी मोर्चा काढण्यात आला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने मेवाणी आणि इतर नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. तर आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार यांच्यावर मोर्चा काढून सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. आता या प्रकरणी महेसाणा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रेश्मा पटेल (NCP leader Reshma Patel) या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत.

उना येथील दलित मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर 12 जुलै 2017 रोजी मेहसाणाजवळील बनासकांठा येथे ‘आजादू कूच’ नावाने आंदोलन करण्यात आले होते.

जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर

सध्या जिग्नेश मेवाणी जामिनावर बाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना आसाम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर जिग्नेश यांना कोक्राझार कोर्टातून जामीन मिळाला. मात्र, काही वेळातच पोलिसांनी जिग्नेशला एका महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दुसऱ्या पोलिस ठाण्यात अटक केली. यानंतर मेवाणी यांना या प्रकरणातही जामीन मिळाला होता. सध्या आसाम सरकारने या जामीनाविरोधात गुवाहाटी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आता या प्रकरणावर 27 मे रोजी सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

रेश्मा पटेल आधी भाजपमध्ये होत्या

रेश्मा पटेल यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्या राष्ट्रवादीच्या आधी भाजपमध्ये होत्या. त्यानंतर डिसेंबर 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता. तर भाजप आता फक्त मार्केटिंग कंपनी बनली आहे, असे म्हटले होते. रेश्मा पटेल या हार्दिक पटेलसोबत पाटीदार आंदोलनाचा भाग होत्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.