AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?; भारतात होतं सिक्रेट मिशन

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तानमध्ये हेरगिरीचे प्रशिक्षण घेतलं. पहलगाम हल्ल्याच्या अगदी आधी तिचे प्रशिक्षण पाकिस्तानातील मुरीदके येथे झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रशिक्षणानंतर ती एका मोठ्या सोशल मीडिया मिशनचा भाग बनली. या मोहिमेअंतर्गत, पाकिस्तान भारताविरुद्ध डिजिटल युद्ध पुकारू इच्छित होता. ज्योतीच्या पाकिस्तान भेटीबद्दल आणि तिच्या ध्येयाबद्दल अजूनही अनेक प्रश्न असून ते अनुत्तरित आहेत.

Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?; भारतात होतं सिक्रेट मिशन
पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?Image Credit source: social media
| Updated on: May 19, 2025 | 2:51 PM
Share

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राने हिला भारतात हेरगिरी करून पाकिस्तानला गुप्त आणि संवेदनशील माहिती पाठवल्यच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेनंतर नवनवे खुलासे होत असून आता एक धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अगदी काही दिवस आधी ती पाकिस्तानला गेली होती. ती 14 दिवस मुरीदके येथे राहिली, जिथे तिने विशेष प्रशिक्षण घेतले आणि नंतर ती भारतात परतली. भारतात येऊन तिला एक विशेष मोहीम राबवायची होती, पण त्याच दरम्यान पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाले. त्यामुळेच तिला काही दिवसांसाठी तिचं मिशन थांबवावं लागलं. पण तिचं हे सीक्रेट मिशन काय होतं, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेर हसिना ज्योती मल्होत्रा ​​अनेक वेळा पाकिस्तानला गेली आहे. मात्र,तिच्या पासपोर्टवर तिने तीनदा पाकिस्तानला भेट दिल्याची एंट्री आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती दरवेळी करतारपूर साहिब मार्गे पाकिस्तानात प्रवेश करायची. पहिल्यांदाच पाकिस्तानला जाण्यासाठी तिने व्हिसा स्वतःहून मिळवला होता, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा पाकिस्तानला जाण्यासाठीचा व्हिसा पाकिस्तानी उच्चायोगात तैनात असलेल्या अधिकारी दानिशने तिला मिळवून दिला होता. असे म्हटले जाते की, ती आणखी दोन-तीन वेळा पाकिस्तानला गेली आहे, परंतु तिच्या पासपोर्टमध्ये याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे, तिने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

हेरगिरीचं ट्रेनिंग, पण मिशनबद्दल सस्पेन्स

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा ​​हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी तिसऱ्यांदा पाकिस्तानला गेली होती. ती भारतातून थेट इस्लामाबादला गेली आणि तिथून मुरीदके येथील एका शिबिरात 14 दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण एका खास मोहिमेसाठी होते असे म्हटले जात आहे. या ट्रेनिंगनंतर, भारतात परतून तिला त्या मिशनर काम सुरू करायचे होते, पण त्याआधीच पहलगाम हल्ला झाला. यामुळे या मिशनचे काम तिला पुढे ढकलावं लागलं. ज्योतीला पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या गोष्टीची काहीच पुष्टी केलेली नाही.

ज्योतीसह मिशनमध्ये अनेकांचा समावेश ?

ज्योती मल्होत्रा ​​जे मिशन सुरू करणार होती, त्यामध्ये ती एकटीच नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत भारतातील दोन डझनहून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहभागी आहेत. हे सर्व असे लोक आहेत ज्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान हा भारतात एका नवीन प्रकारचे युद्ध सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीयांच्या मनात पाकिस्तानची प्रतिमा निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता.

हिसारच्या एसपींनी काय सांगितलं ?

यासोबतच, भारतातील लोकांना त्यांच्याच देशाविरुद्ध आणि त्यांच्याच सरकारविरुद्ध उभे करायचे होते. भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणे हेदेखील या मिशनमध्ये समाविष्ट होते. रविवारी पत्रकार परिषदेत हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनीही असाच दावा केला. युद्ध हे केवळ दोन देशांच्या सीमांवर नव्हे तर शत्रु देशाच्या आतही होतं, असं त्यांनी ज्योती मल्होत्राची चौकशी केल्यानंतर सांगितलं. पाकिस्तानने डिजिटल युद्धाचे असेच एक अभियान सुरू केले असून ज्यामध्ये ज्योती मल्होत्रा ​​देखील एक प्यादं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.